महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने ध्वजारोहण

 

कोल्हापूर:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने सोमवार दि.1 मे, 2017 रोजी महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र दिनाचे औचित्त साधून कचरा विलगीकरणासंबधी प्रबोधनात्मक व्हिडिओ चित्रफितीचे प्रसारण करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 अन्वये सर्व महापालिकामध्ये दि.1 मे ते 31 डिसेंबर या कालावधीत कचरा विलगीकरण उपक्रम राबविणेबाबत शासनाकडून निर्देश दिले आहे.
महापौर सौ.हसिना फरास यांनी बोलताना प्रायोगिक तत्वावर शहरातील रामानंदनगर-जरगनगर, कळंबा फिल्टर हाऊस, तपोवन, फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, सुर्वेनगर, कनेरकरनगर-क्रांतीसिंह नाना पाटीलनगर व क्रांतीसिंह नाना पाटीलनगर-जिवबा नाना पार्क या आठ प्रभागामध्ये ओला व सुका कचरा विलगीकरण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असलेचे सांगितले. तसेच ओल्या कचऱ्यापासून सेंद्रीय खत तसेच सुक्या कचऱ्याचा पुर्नप्रक्रियेसाठी वापर करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेमार्फत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विभागवार घनकचरा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी ओला व सुका कचरा असा वेगवेगळया स्वरुपात देवून महापालिकेस या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन महापौर सौ.हसिना फरास यांनी केले.
यावेळी दि.23 एप्रिल 2017 रोजी जोतिबा यात्रेसाठी आलेले भाविक महेश चंद्रकांत चव्हाण हे पंचगंगा नदीत बुडत असताना त्यांना शर्तीचे प्रयत्न करुन वाचविले याबद्दल अग्निशमन विभागाचे स्टेशन ऑफिस तानाजी कवाळे, फायरमन संग्राम पाटील व वाहनचालक दत्तात्रय जाधव यांचा महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते रोप व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी आयुक्त अभिजीत चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ.संदीप नेजदार, महिला व बालकल्याण सभापती सौ.वहिदा सौदागर, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, नगरसेविका सौ.सुरमंजिरी लाटकर, उपआयुक्त विजय खोराटे, ज्ञानेश्वर ढेरे, सहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, उपशहर अभियंता एस.के.माने, रमेश मस्कर, हर्षजित घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.अरुण परितेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील, अग्निशमन दलाचे जवान, व्यायामशाळा प्रशिक्षक,  राजमाता हायस्कुलच्या मुख्याधिपीका सौ.अजंली जाधव, विद्यार्थीनी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!