
मुंबई:स्टार प्रवाहवरील दुहेरी मालिकेतला दुष्यंत ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्य संकेतपाठकवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. हँडसम संकेतने आपल्या वाढदिवसानिमित्तचाहत्यांसाठी त्याची लहानपणाची एक गमतीदार आठवण शेअर केली आहे. हीआठवण वाचून तुम्हाला नक्कीच हसू येईल.
संकेत सांगतो, नाशिकला असताना मी आणि त्याचा मित्र चिरणजीत नेहमी काही नाकाही गमतीजमती करायचो. एकदा आम्ही सिनेमा पहायला गेलो. त्यावेळीआमच्याकडे फारच थोडे पैसे होते. आम्ही सिनेमाचं तिकीट काढलं आणिइंटरव्हलमध्ये पैसे वाचवण्यासाठी बाहेरून शौकिनची भेळ घेतली. थिटएटरमध्येबाहेरचे खाद्यपदार्थ न्यायला बंदी असल्यानं आम्ही भेळ हेल्मेटमध्ये दडवली होती.सिक्युरिटी गार्ड्सनी आम्हाला आणि आमच्या बॅगा चेक केल्या. मात्र, आमचं हेल्मेटबाजूला ठेवायला सांगितलं. हेल्मेटमध्ये काही ठेवलं असेल, हे त्यांच्या लक्षातच आलंनाही. ही आयडिया यशस्वी झाल्यानंतर आम्ही अनेकदा अनेकदा हेल्मेटमधून भेळनेली आणि इंटरव्हलमध्ये खाल्ली. फक्त ५० रुपयांत आम्ही फुल्ल धम्माल करायचो.’मालिकेत एकदम छान भूमिकेत दिसणाऱ्या संकेतचा हा पराक्रम वाचून तुम्ही नक्कीचथक्क झाला असाल.
Leave a Reply