
कोल्हापूर : आजच्या धावपळीच्या जगात फ़िजिओथेरपी हि उपचार पद्धती झपाट्याने लोकप्रिय होत आहे. कोणतेही शारीरिक दुखणे, पॅरेलेसीस (अर्धांगवायू), ज्यांच्या शरीराच्या अवयवांच्या हालचाली व्यवस्थित नाहीत, लहान मुलांमध्ये ज्यांची वाढ कमी आहे, स्नायू व मणक्याचे विकार अशा कोणत्याही आजारावर इंजेक्शन किंवा औषधे न घेता प्रभावी उपचार पद्धती म्हणजे फिजिओथेरपी. तसेच फक्त वरील दुखण्यासाठीच नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यातील मानसिक ताणतणाव मुक्तीसाठी व आपले शरीर आरोग्यदायी बनविण्यासाठीही या अॅक्वा थेरपी उपचार पद्धतीचा वापर करण्याकडे लोकांचा ओढा वाढला आहे. वजन कमी करणे, कोअर मसल स्ट्रेजनिंग, रोजचे व्यायाम यासाठी अॅक्वा थेरपीचा वापर केल्याने निश्चितच आपण मानसिक ताणतणावापासून दूर राहू शकतो. आजकाल आपल्याकडे असणाऱ्या भौतिक सुविधांच्या वापरामुळे आपल्या शरीराची हालचाल खूपच कमी होते. यातून वजन वाढणे आणि त्याअनुशंगाने इतर आजाराला आपण स्वतःहून निमंत्रण देतो, याच्यावर फ़िजिओ व अॅक्वा थेरपी हा उत्तम उपाय आहे. या फ़िजिओथेरपीतच आता आधुनिक अशा नवीन उपचार पद्धतीचा समावेश झालेला आहे. ती म्हणजे अॅक्वा थेरपी म्हणजेच पाण्यामध्ये करावयाचे विशिष्ठ प्रकारचे व्यायाम. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारची थेरपी सर्वांच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. अशी माहिती अर्थो आणि स्पोर्ट् इंज्युरी अॅक्वा थेरपिस्ट डॉ. हृषीकेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
लोकांना या आधुनिक अॅक्वा थेरपी उपचार पद्धतीची माहिती व्हावी यासाठी ७ मे २०१७ रोजी हॉटेल कृष्णा इन डी मार्ट शेजारी, ताराबाई पार्क,कोल्हापूर येथे सकाळी ११ ते २ यावेळेत सर्वांच्यासाठी मोफत सेमिनारचे आयोजन केलेले आहे. यामध्ये सर्व माहिती देवून लोकांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. तसेच ज्यांना या थेरपी बद्दल अधिक जाणून, उपचार घ्यायचे आहे त्यांनी डॉ. हृषीकेश जाधव, हिलिंग टच फिजिओ अॅक्वा स्पोर्ट् इंज्युरी क्लिनिक शाहूपुरी २ गल्ली, मेट्रो हॉस्पिटल जवळ, कोल्हापूर येथे अथवा 9765577600 या नंबरवर संपर्क अथवा व्हाटसअप वर संपर्क साधावा, तरी या सेमीनारचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. ऋषिकेश जाधव यांनी केले आहे.पत्रकार परिषदेस डॉ. राजकुमारी,निलेश कांबळे, सौरभ माळी आणि सुरज राजपूत उपस्थित होते.
Leave a Reply