
मुंबई:
विनोद असो किंवा धीरगंभीर प्रसंग, अभिनेता सुनील तावडे प्रत्येकवेळी दमदार अभिनयाचं नाणंखणखणीत वाजवतात. स्टार प्रवाहवरील ‘दुहेरी’ या लोकप्रिय मालिकेतील परसू ही खलनायकीव्यक्तिरेखा प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. सुनील तावडे यांनी या परसूच्या माध्यमातून आतापर्यंततब्बल १५ वेगवेगळी रुपं निभावली आहेत. आपल्या खास शैलीत ही रूपं सादर करून त्यांनीमालिकेची रंगत वाढवली आहे.सूर्यवंशी कुटुंबाला त्रास देण्यासाठी परसू प्रयत्न करतो आहे. त्यासाठी तो काहीही करायला तयारअसतो. त्यासाठीच त्यांनं वेगवेगळी रूप घेतली. कधी तो चणेवाला झाला, कधी भेळवाला झाला,कधी स्त्री वेश घेऊन थेट मंगळागौरीचे खेळ खेळला, तर कधी साधूचा वेश धारण केला. अचूकमेकअप, वेशभूषा आणि खणखणीत अभिनयाने बेमालूमपणे केलेला व्यक्तीमत्वातला बदलयामुळे समोर आलेल्या परसूचा कुणाला संशयही आला नाही आणि परसू आपली खेळी खेळतराहिला. परसूच्या प्रत्येक व्यक्तिरेखेनं मालिकेत नाट्य निर्माण झालं. बहुढंगी खलनायक साकारणं हा छान अनुभव असल्याचं सुनील तावडे यांनी सांगितलं. ‘परसू याएका व्यक्तिरेखेच्या माध्यमातून अनेक व्यक्तिरेखा साकारायला मिळतात. मात्र, प्रत्येक व्यक्तिरेखाएकमेकांपेक्षा वेगळी दिसण्याची मी पूर्ण काळजी घेतो. माझ्या आजुबाजूला असलेल्या माणसांतूनकाही ना काही गुण-दोष मला दिसतात. त्यांचा वापर मी या व्यक्तिरेखा करण्यासाठी करतो.त्यामुळे परसू आणि इतर व्यक्तिरेखा अशी एका वेगळीच स्पर्धा माझ्यासाठी आहे असं मी मानतो.वेगवेगळ्या व्यक्तिरेखा करण्याचा मला अनुभव आहे. त्याचा फायदा नक्कीच होतो. या पुढेहीमालिकेत वेगवेगळ्या रूपांत दिसेन,’ असंही तावडे म्हणाले. सध्या हा परसू बबन सुर्वे होऊन सूर्यवंशी कुटुंबात रहात आहे. असा बहुरंगी अभिनयाचा स्टारप्रवाहवर सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता दुहेरी या मालिकेत पाहायला मिळत असून या व्यक्तीरेखेची आणि मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
Leave a Reply