थेट पाईपलाईनसंदर्भात महापालिकेत आढावा बैठक संपन्न

 

कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेच्या कामाचा आढावा महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महापौर सौ.हसिना फरास यांनी या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. आ.हसन मुश्रीफ, आ.राजेश क्षीरसागर, आ.सतेज ऊर्फ बंटी पाटील, आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांचे उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
प्रारंभी जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी योजनेची माहिती दिली. जॅकवेलचे काम प्रगतीपथावर असून पुईखडी येथील काम 50 टक्के पुर्ण झाले असलेचे सांगितले.  पाटबंधारेची लेखी परवानगी नसलेने काल काम बंद पाडले आहे. याबाबत पाटबंधारे खातेच्या संबधीत अधिकाऱ्यांना विचारले असता, मुंबईतील बैठकीचे इतिवृत्त अजून प्राप्त झालेले नाही अशी माहिती दिली आहे. 52 कि.मी. पैकी 34 कि.मी. पाईपलाईन टाकणेचे काम पुर्ण झाले आहे. यामध्ये 6 ठिकाणी ब्रीज बांधणे प्रस्तावित आहे. या ब्रीज/पुल बांधणेसाठी टेंडरमध्ये लमसम रक्कम धरलेली आहे. ठिकपुर्ली येथील ब्रीजचे काम पुर्ण झालेले आहे. प्रत्यक्ष काम व निविदेमध्ये तफावत झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर काम करताना रक्कमेमध्ये फरक येत आहे.    टेंडर कंडीशनप्रमाणे ब्रीजसाठी 60 टक्के म्हणजे रु.1.25 लाख बील अदा केले आहे. आता आयटमवाईज कॉस्ट रु.25 लाख येते त्याप्रमाणे बील आदा केले जाईल. जादा रक्कम पुढील बीलातून वसुल केली जाईल असे सांगितले.
आ.सतेज पाटील यांनी बोलताना शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी पुरवठा करणे हे लोकांचे स्वप्न आहे. ही योजना लवकर पुर्ण व्हावी ही सर्व शहरवासियांची भावना आहे. कारण नसताना योजनेला खो घालणेचा प्रकार सुरु आहे. कामामध्ये जे चुकीचे असेल तेथे दुरुस्ती करुन खो घालणेचा प्रकार हाणून पाडू. महापालिकेचा 10 टक्के हिस्सा शासनाने उचलावा व जुन्या मंजुर धोरणाप्रमाणेच योजना पुर्ण व्हावी अशी विनंती आम्ही मा.मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना केली असलेचे सांगितले. तसेच योजना लवकर पुर्ण होणेसाठी आयुक्तांना कुठे आमची मदत परवानगीसाठी हवी असेल तेथे आम्हाला प्रशासनाने सांगितले पाहिजे. शासनदरबारी आम्ही त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करु असे सांगितले.
आ.हसन मुश्रीफ यांनी बोलताना प्रत्येक कामासाठी लमसम किंमत न धरता एैटमवाईज काम चेक करुन बील अदा करा. योजनेच्या कामावर देखरेखीसाठी स्टेअरिंग कमिटी नेमा. यामध्ये आयुक्त, महापौर, सर्व पदाधिकारी व उपायुक्त यांची नियुक्ती करा. या कमीटीची आयुक्तांनी दर महिन्याला बैठक घ्यावी असे सांगितले.
आ.राजेश क्षीरसागर यांनी बोलताना कोणत्याही कामाबाबत अंदाजित खर्च धरुन ठेकेदाराचा फायदा का करायचा यासाठी आत्ताच निविदेमध्ये ज्या ऐटमला लमसम रक्कम धरलेली आहे त्यांची तपासणी करुन ठेकेदारास कामानुसार बीले अदा करावीत असे सांगितले.
नगरसेवक जयंत पाटील यांनी कन्सलटंटमुळे योजनेचे वाटोळे झाले आहे. आम्ही मार्ग बदलायला सांगितला असताना पुर्वी कन्सलटंटने ऐकले नाही. नंतर चुक लक्षात आल्यावर त्यांनी मार्ग बदलला. कन्सलटंटकडे चांगल्या दर्जाचा स्टाफ नेमणेचे ठरले होते. इंजिनिअरर्सना ड्रेसकोड ठरलेला होता अद्याप कोणतीही अंमलबजावणी कन्सलटंटने केलेली नाही. टेंडरमध्ये डीएसआरमध्ये जे ऐटम नसतात फक्त त्यासाठीच लमसम रक्कम धरली जाते. परंतु कन्सलटंटने जाग्यावर बसून टेंडर तयार केले आहे. कन्सलटंटकडून काही होणार नाही. त्याच्यामुळेच ही योजना बारगळत आहे असे सांगितले.
आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी बोलताना मी स्वत: लक्ष घालून ही योजना मार्गी लावणेचा प्रयत्न करीन असे सांगून महापालिकेचे इतर रखडलेले प्रकल्प मार्गी लावणेचा प्रयत्न करीन अशी ग्वाही दिली.
महापौर सौ.हसिना फरास यांनी बोलताना या योजनेसाठी स्वतंत्र अधिकारी नेमणेचे आदेश प्रशासनास दिले. सदरची योजना दर्जेदार व पारदर्शक ठेवून लवकरात लवकर ही योजना पुर्ण व्हावी असे सांगितले. स्थायी समिती सभापती डॉ.संदीप नेजदार यांनी आभार मानले.
युनिटी कन्सलटंटचे महेश पाठक यांनी डीपीआर एमजीपी व राज्य शासनाकडून मंजूर करुन आणलेला आहे. अंदाजित रक्कमेवर सुरुवातीला निविदा काढली होती. जादा दराचा समावेश निविदेमध्ये झालेला आहे. ठिकपुर्ली कामाबाबत उपमहापौरांचे पत्र प्राप्त झालेवर प्रत्यक्ष कामाची तपासणी केली असता रक्कमेमध्ये तफावत आढळून आलेली आहे. दिलेले बील हे अंतिम नसून जादा बीलांची रक्कम पुढील बिलात वसूल करु शकतो असे पत्र संबधीत ठेकेदारास आजच दिले असलेचे सांगितले.
गटनेता शांरगंधर देशमुख, नगरसेवक भुपाल शेटे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी ही योजना बारगळले बद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
बैठकीस उपमहापौर अर्जुन माने, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.वहिदा सौदागर, सभागृहनेता प्रविण केसरकर, प्रभाग समिती सभापती सौ.प्रतिक्षा पाटील, अफजल पिरजादे, सौ.छाया पोवार, सुरेखा शहा, गटनेता शारंगधर देशमुख, सुनिल पाटील, नगरसेवक/नगरसेविका, उपायुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता एस.एन. गरंडे, कार्यकारी अभियंता ए.बी. भोई, युनिटी कन्सलटंटचे महेश पाठक, नरेश नानोडकर, ए.बी. चौगले, दिपक कदम, आर.एस.कुलकर्णी, जेकेसी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र माळी, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!