मला काहीच PROBLEM नाही’ :चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच

 

मुंबई: मला काहीच PROBLEM नाही… अचानक हे असं वाक्य एखाद्याच्या तोंडून ऐकणं हेच किती PROBLEMATIC असतं नाही? हाच PROBLEM काही दिवसांपूर्वी गश्मीर आणि स्पृहाच्या चाहत्यांनी अनुभवला जेव्हा या जोडीने सोशल मिडियावर मला काहीच PROBLEM नाही असं म्हटलं… हे असं म्हणणाऱ्या आपल्या लाडक्या कलाकाराच्या आयुष्यात खरंच काही प्रॉब्लेम नाही की आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स लपवण्यासाठीचा हा अट्टहास? या कोड्यात अडकलेल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलं आहे गश्मीर – स्पृहाच्या नव्या चित्रपटाचं नवं कोरं टीझर पोस्टर…

फिल्मी किडा निर्मित या चित्रपटाच्या पोस्टरवर मला काहीचPROBLEM नाही असा आव ही जोडी आणते आहे…मात्र हे म्हणण्या इतपत कोणता प्रॉब्लेम या जोडीच्या आयुष्यात झाला आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटासाठी गश्मीर – स्पृहा ही आगळी – वेगळी जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

समीर विद्वांस यांनी या युगाचा प्रॉब्लेम दिग्दर्शित केला असून पी. एस छतवाल, रीचा  सिन्हा  आणि रवी सिंह ह्यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील इतर कलाकार आणि त्यांचे प्रॉब्लेम्स लवकरच आपल्यासमोर येतील. हे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स सोडवतील का? हे येणारा काळच सांगेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!