कचरा व्यवस्थापनेसाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा:पालकमंत्री चंद्रकांत पाटील

 

कोल्हापूर – शहरातील कचरा समस्यचे संपूर्णपणे निर्मुलन करावयाचे असेल तर त्यासाठी शासन व महानगरपालिकेबरोबरच लोकसहभागही तेवढाच महत्वाचा आहे. नागरिक व प्रशासन यांच्या परस्पर सहभागातून कोल्हापूर शहरातला कचरा संपला पाहिजे इतकेच नव्हेतर जैव प्रकल्पाअंतर्गत शहरातला कचरा विकला गेला पाहिजे अशी स्थिती आपण निर्माण करू तेव्हाच शहरातील कचरा समस्येचे मुळातून उच्चाटन होऊ शकेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जरगनगर मैलखड्डा येथे आयोजित जैविक खत निर्मिती पर्थदर्शी प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महापौर हसीना फरास, उप महापौर अर्जुन माने, स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे , नगरसेविका वृषाली कदम, एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, उपाध्यक्ष संजय पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. अरुण परीतेकर यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जैविक खत निर्मिती प्रकल्पाचे व ऑरगॅनिक वेस्ट कनव्हर्टर मशीनचे उद्घाटन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या परीस सेंद्रिय खतांची मात्र रोपांना देऊन अभिनव पद्धतीने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महानगरपालिका व एकटी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जरगनगर व तपोवन या दोन प्रभागापुरता सुरु झालेला कचरा जैविक खत निर्मितीचा हा अभिनव प्रकल्प असून अशा प्रकारे तीन -चार प्रभाग मिळून क्लस्टर स्वरूपात कोल्हापूर शहरात सर्व ठिकाणी प्रकल्प सुरु होणे आवश्यक आहे. यामुळे कचरा निर्मूलना बरोबरच परिसर सेविकांना रोजगाराची उपलब्धी होऊन त्यांना आर्थिक उत्पन्न मिळेल, तर शहरातील आरोग्याचा प्रश्नही त्यामुळे मार्गी लागेल. या प्रकल्पामुळे जरगनगर व तपोवन प्रभागातील २० परिसर सेविकांना सुक्या कचऱ्या पासून आर्थिक उत्पन्न मिळत असून ओल्या कचऱ्या पासून तयार करण्यात येणाऱ्या परीस सेंद्रिय खताच्या विक्रीतून संस्थेला पर्यायाने परिसर सेविकांना आर्थिक उत्पन्न मिनार आहे. शिवाय कचऱ्यापासून तयार झालेल्या सेंद्रिय खताचा शेतीसाठी उत्तम वापर करणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प संपूर्ण शहरभर राबविला तर जवळपास आठशे परिसर महिलांना रोजगार निर्मिती होऊ शकते. तथापि हा प्रकल्प यशस्वी करावयाचा असेल तर लोकसहभागही तेवढाच गरजेचा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!