
कोल्हापूर: शेती मालाचे उत्पादन कमी झाले किंवा त्याच उत्पादनाला जर कमी हमीभाव मिळाला तर शेतकरी आत्महत्या करतो.शेती क्षेत्रात असंख्य अडचणी आहेत.५० टक्के पेक्षा जास्त आज जमिनीचा पोत कमी झालेला आहे.शेतकरी आज संपूर्ण दृष्टचक्रात अडकलेला आहे.या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी आज शाश्वत योगिक शेतीची गरज आहे.ब्रह्मकुमारी सारख्या संस्था राज्यातील आणि देशातील शेतकरी आणि शेतीसाठी शाश्वत आणि योगिक शेती सारखे प्रयोग करत आहे.शेतकऱ्यांच्या बाजूने ही संस्था उभी आहे.सर्वाना बरोबर घेऊन जाण्याच्या प्रवृत्तीमुळेच आज आत्मविश्वास हरवलेल्या शेतकऱ्याला या संस्थांच्या माध्यमातून पुन्हा आत्मविश्वास देऊन त्यांना जगण्यासाठी नवे बळ देता येईल असे प्रतिपादन कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.ब्रह्मकुमारीच्या कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दोन दिवसीय किसान महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.हरितक्रांतीनंतर रासायनिक आणि कीटकनाशक यांचा वापर शेतीत अधिक झाल्याने आजार आणि प्रदूषण वाढू लागले.तसेच वाढत्या लोकसंख्येचा विचार करता याला समर्थ पर्याय शोधणे गरजेचे आहे.बाजार भाव स्थिर राहण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.तूर उत्पादक शेतकरी यांच्यासोबत शासन आहे.असेही नामदार खोत यांनी सांगितले.
कार्यक्रमास ब्रह्मकुमारी कृषी विभाग प्रमुख ब्र.कु.राजू भाईजी,महाराष्ट्र राज्य कृषी प्रशिक्षण आणि संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.राम खर्चे,डॉ.पाडुरंग वाठारकर,प्राचार्य डॉ.गजानन खोत.दापोली विद्यापीठ संशोधक डॉ.राउत,सुनंदा बेह्नजी,दशरथ भाई यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली.यावेळी पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी.एम.पाटील,एम.आर.पाटील,ब्रह्मकुमारी गोवा विभाग प्रमुख ब्र.कु.शोभा बहेनजी,उद्योगपती बसवराज आजरी,गोपाल झंवर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply