
कोल्हापूर: बी न्यूजचे गारगोटीचे पत्रकार कै. रघुनाथ शिंदे हे गव्याच्या हल्ल्यात जखमी झाले आणि उपचारासाठी नेताना त्यांचे दु:खद निधन झाले.आज कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालयात सर्व प्रसार माध्यमातील पत्रकार बंधू आणि भगिनी यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.आपले बातमी मिळविण्याचे कर्तव्य बजावत असताना त्यांना आपले प्राण गमवावे लागले.यावेळी बी न्यूज चे पत्रकार विजय कुंभार,सामना चे प्रतिनिधी शीतल धनवडे,एस न्यूज चे पत्रकार अमर पाटील,तरुण भारतचे पत्रकार बाळासाहेब उबाळे,जिल्हा माहिती कार्यालायाचे एस.आर.माने,स्वामी विवेकानंद ट्रस्टचे किशोर घाटगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खासदार धनंजय महाडिकही या शोक सभेस उपस्थित होते.त्यांनी बी न्यूजच्या वतीने 2 लाख रुपये मदत शिंदे यांच्या कुटुंबियांना दिली.तसेच शासनाकडून ८ लाख रुपये मदत त्यांच्या कुटुंबियांना मिळणार आहे.शोक सभेस प्रेस क्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे,उपाध्यक्ष तानाजी पोवार,खाजानीस युवराज पाटील,संचालक विजय कुंभार,सतीश सरीकर,शुभांगी तावरे,शिवाजी साळोखे,शीतल धनवडे यांच्यासह सर्व पत्रकार,छायाचित्रकार,कॅमेरामन उपस्थित होते.
Leave a Reply