मदर्स डे निमित्त ‘स्टार प्रवाह’ने साधला प्रेक्षकांशी संवाद

 

सोशल मीडियात आईबरोबरचा फोटो किंवा डीपी ठेवून, आईला फिरायला, जेवायला बाहेरनेऊन मदर्स डे साजरा केला जातो. ज्यांना प्रत्यक्ष भेटायला वेळ नसतो, ते ऑनलाईन गिफ्टपाठवतात. मदर्स डेच्या दिवशी आईला आनंद मिळणं हेच खरं गिफ्ट ठरेल.  मात्र, टिपिकलगोष्टींच्या पलीकडे आपण काय करू शकतो, याचा विचार स्टार प्रवाह टीमने केला आणित्यांतून #AaiSaathiKaayPan  ही एक  सुंदर कल्पना सुचली.

‘स्टार प्रवाह’नं कायमच परंपरा, मुल्य, नातेसंबंध, संस्कृती जपण्याला प्राधान्य दिलं आहे. गोठ,नकुशी, पुढचं पाऊल, दुहेरी अशा सर्वच लोकप्रिय मालिकांतून आपल्या संस्कृती, नातीजपण्याचा संदेश दिला जातो. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरी केला जाणाऱ्या मदर्स डेनिमित्त स्टार

प्रवाहनं एक अनोखा प्रयोग केला आहे. आपल्या काही प्रेक्षकांशी संवाद साधून त्यांना आईचीकोणती सवय आवडत नाही, असं विचारलं. मोबाईलवर खेळलं तर आई सतत ओरडत रहाते,गाडी जराही फास्ट चालवू देत नाही, सकाळी उगाचच लवकर उठवते, मिरची खाऊ देत नाहीअशी

उत्तरं दिली. मात्र, ही तुमचीच वाईट सवय नाही का, असा प्रश्न विचारल्यावर  त्यांना जाणवलं,की खरंतर ही वाईट सवय आपली आहे, आईची नाही! प्रेक्षकांबरोबरच्या या मुलाखतींचेव्हिडिओ ‘स्टार प्रवाह’च्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आले असून, त्यांना उत्तम प्रतिसादलाभतो आहे. सोशल मीडियामध्ये हे व्हिडिओज  #AaiSaathiKaayPan  या हॅशटॅगसहपोस्ट करण्यात आले आहेत. तसंच स्टार प्रवाह एचडीवरही हे व्हिडिओ दाखवण्यात येतआहेत.

आपलं प्रत्येकाचं आपल्या आईवर प्रेम असतं. मात्र, आपली आई आपल्याला सतत बोलते,ओरडत रहाते असं आपल्याला वाटतं. आई आपल्याला बोलते, कारण आपण चुकत असतो.आपल्या अयोग्य सवयी सुटाव्यात असं तिला वाटत असतं. आपल्या वागण्यात चूक आहे,याचं आपल्याला भान नसतं. या मदर्स डेला

आईला आपली न आवडणारी रोजची सवय सोडा आणि तिला सरप्राईज द्या. आईच्याआनंदाने दररोजच मदर्स डे साजरा होईल. त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या… आता थांबायचंनाय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!