
सध्या भारतात ‘बाहुबली फिवर’ पहायला मिळत आहे. ‘बाहुबली २’ प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. मात्र, प्रभासनं ‘बाहुबली १’ मध्ये शिवलिंग खांद्यावर उचलेला फोटो प्रचंड लोकप्रिय ठरला होता. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येही हा बाहुबली फिवर पहायला मिळत आहे. स्टार प्रवाहवर २२ मे पासून दाखल होत असलेल्या ‘कुलस्वामिनी’ या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता संग्राम साळवीनं बाहुबलीप्रमाणेच देव्हारा खांद्यावर उचलून घेतल्याचं दिसत आहे.
या प्रोमोमध्ये संग्रामनं ‘या घरात देवीला स्थान नाही’ असं म्हणून देव्हारा खांद्यावर उचलून घेतला आहे. या मालिकेच्या दमदार प्रोमोमुळे या मालिकेच्या कथानकाविषयी, संग्रामच्या भूमिकेविषयी नक्कीच उत्सुकता वाढली आहे. संग्रामचं आणि स्टार प्रवाहचं नातं जुनं आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेली ‘देवयानी’ ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेतील त्याचा ‘तुमच्यासाठी काय पण’ हा डायलॉग विशेष लोकप्रिय ठरला होता. आता ‘कुलस्वामिनी’ या मालिकेद्वारे संग्राम बऱ्याच काळानं स्टार प्रवाहवर परततो आहे.
एक वेगळ्या धाटणीचं कथानक असलेली ‘कुलस्वामिनी’ ही मालिका स्टार प्रवाहवर २२ मे पासून सुरू होत आहे. सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ही मालिका दाखवली जाणार आहे.
Leave a Reply