
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाला आज (मंगळवार) तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे भाजपकडून देशभरात २६ मेपासून १५ जूनपर्यंत ‘मोदी फेस्टिव्हल’ साजरा करण्यात येणार आहे. देशातील ९०० शहरांमध्ये हा उत्सव साजरा केला जाईल. हा उत्सव २० दिवस सुरु राहणार आहे.
त्याचबरोबर पंतप्रधान मोदी सामान्य नागरिकांसाठी दोन कोटी पत्र लिहिणार आहेत. आणि १५ दिवसात १० कोटी एसएमएस केले जातील. तसेच ५०० शहरांमध्ये ‘सबका साथ, सबका विकास’ कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे.
पंतप्रधान मोदी देशाच्या ५ शहरांचा दौरा करतील, ज्याची सुरुवात गुवाहाटीपासून होईल. यानंतर मोदी बंगळुरु, पुणे, कोलकाता, जयपुर आणि कोटापैरी या ४ शहरात जातील. यामध्ये २५ मेपासून सुरु होणाऱ्या न्यू इंडिया अभियानची माहिती दिली जाणार आहे.
Leave a Reply