
पणजी (प्रतिनिधी) : गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या बहुचर्चित अशा ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ या नावाने पर्यटकांसाठी खास बस सेवा आजपासून (शनिवार) सुरू करण्यात आली. पणजी येथे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते फीत कापून आणि झेंडा दाखवून या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले.
हॉप ऑन हॉप ऑफ अंतर्गत दोनापावला ते जुने गोवे दरम्यान ही बस धावणार आहे. या बसमधून पर्यटकांना दररोज मीरामार, जुने सचिवालय, गोवा वस्तुसंग्रहालय आदी १९ ठिकाणे दाखवली जाणार आहेत. पर्यटकांना या सफारीसाठी २४ तासासाठी ४०० रुपये मोजावे लागणार आहेत.
Leave a Reply