
येत्या रविवारी गांधीनगर येथे हरे माधव सत्संग कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर: हरे माधव सत्संग समिती गांधीनगर यांच्यावतीने सद्गुरू बाबा ईश्वरशाह साहिब यांच्या समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मनःशांतीसाठी अनादी काळापासून मानव प्रयत्न करत आला आहे. आणि करतो आहे.यासाठी अनेक साधू संतानी उपदेश केले आहेत.मानवी मनाचा वेध हा धागा पकडून विद्यमान सद्गुरू बाबा ईश्वरशाह साहिब यांनी मानवी मनाचा शोध घेण्याचे कार्य सुरु केले अव्याहतपणे आहे.याचाच एक भाग म्हणून गांधीनगर येथील छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलच्या पटांगणात येत्या रविवारी २१ मे रोजी सायंकाळी त्यांच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती समितीचे अध्यक्ष लखमीचंद नागदेव यांनी पत्रकार परिषदेत दिली.हरे माधव सत्संग परिवारात आता लाखो लोकांचा सहभाग आहे.तरी या सत्संगाचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला गोवालदास दुल्हानी,मनोहर चेनानी,अनिल चंद्वानी यांच्यासह सत्संग समितीचे सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply