
मुंबई : अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवत असून हा चित्रपट बाहुबलीपेक्षा भव्यदिव्य असल्याचं आपण ऐकल्याचं दिग्दर्शक रामगोपाल वर्माने म्हटलंय. राम गोपाल वर्माने ट्विटरवरुन रितेशचं कौतुकही केलं आहे.
२२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत. तर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत खुद्द रितेश देशमुख दिसणार असल्याची माहिती आहे.
या चित्रपटात सलमान खानची सुद्धा भूमिका आहे. यानिमित्त सलमान खान मराठी फिल्म मध्ये दिसणार असून रितेश आणि सलमान खान हे एकत्र मोठया पडद्यावर दिसणार आहेत
Leave a Reply