
कोल्हापूर: बीसीसीआय मान्यताप्राप्त देशात प्रसिद्ध असलेला आयपीएल टी २० सेमीफायनल सामना येत्या १९ मे रोजी होणार आहे.याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बीसीसीआयने भारतातील २१ राज्यातील ३६ शहरांची निवड केली आहे.आणि महाराष्ट्रात फक्त ४ शहरांची निवड केली आहे.या शहरात स्टेडियम सारखे वाटावे असा फॅन पार्क उभारण्यात येणार आहे.हाच सामना त्या शहरतील लोकांना विनामुल्य ३२ बाय १८ इतक्या मोठ्या पडद्यावर म्हणजेच एलईडी स्क्रीनवर विनामुल्य पाहायला मिळणार आहे.यासाठी सलग दुसऱ्यांदा कोल्हापूर शहराची निवड केली गेली असून येत्या १९ मे रोजी सायंकाळी ६ ते १० यावेळेत रुईकर कॉलनी येथील मैदानात या सेमीफायनल सामन्याचा थरार स्टेडियमप्रमाणे कोल्हापुरकारांना अनुभवता येणार आहे.बीसीसीआय आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यावतीने कोल्हापुरात हा फन पार्क उभारण्यात येणार आहे.मागील वर्षी भरगोस प्रतिसादामुळेच यावर्षीही कोल्हापूरला हा मान पुन्हा मिळाला आहे अशी माहिती असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे आणि उपाध्यक्ष चेतन चौगुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
थेट प्रक्षेपण आणि त्याबरोबरच संगीत,विविध खाद्य स्टॉल्स यासह सेमीफायनल सामना,स्टेडियमसारखे वातावरण आणि लकी ड्रा कुपन्, यात जिंकणाऱ्याला दोन विवो मोबाईल यामुळे हा सामना बघण्यासाठी वेगळीच रंगत येणार आहे.ज्यांना प्रत्यक्ष सामना बघायला जमत नाही अश्या क्रिकेटप्रेमींसाठी अश्या प्रकारचा फॅन पार्क एक पर्वणीच ठरणार आहे.डीएनए या इव्हेंट आणि नेटवर्क यांनी फॅन पार्कची उभारणी प्रत्यक्ष स्टेडियमप्रमाणे केली आहे. पत्रकार परिषदेला इव्हेंट हेड आदित्य जोशी,संचालक नितीन पाटील,कृषणात धोत्रे,बीसीसीआयचे प्रतिनिधी विकास पंडित यांच्यासह संचालक आणि सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply