
कोल्हापूर: ओबीसी जनक्रांती परिषद यांच्यावतीने २८ मे २०१७ रोजी हॉटेल सयाजी येथे दुपारी २ ते ७ यावेळेत ओबीसी समाजाचा लढा पुढे नेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.गेल्या ४० वर्षापासून या समाजाकडे नेत्यांचे दुर्लक्ष झाले आहे.प्रस्थापितांनी याला दाबून ठेवले आहे. शोषित.पिडीत,वंचित समाजाला न्याय देण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अनिल महाजन यांनी केले आहे.सादर बैठक ही कुठल्याही जाती,धर्म यांच्या विरुद्ध नसून मूळ ओबीसींच्या न्याय आणि हक्कासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी आयोजित केली आहे. ओबीसी कष्टकरी समाज आपल्या न्याय हक्कासाठी सनदशीर मार्गाने संघर्ष करणार आहे असेही ते म्हणाले.ओबीसींच्या हिताचे ठराव या बैठकीत संमत करण्यात येणार आहेत.पत्रकार परिषदेस प्रसिद्धी प्रमुख गणेश पुजारी,शिवाजी माळकर यांच्यसह परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply