
कोल्हापूर :संस्थान काळामध्ये बांधण्यात आलेल्या शिवाजी पुलाचे आयुष्यमान संपल्यामुळे पर्यायी पूल बांधण्याचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु ७०% काम पूर्ण झालेनंतर पुरातत्व विभागाच्या मार्गतत्वानुसार ब्रम्ह्पुरी टेकडी हि केंदीय पुरातत्व विभागामध्ये संरक्षित वास्तू म्हणून असल्यामुळे या पुलाचे बांधकाम राखडलेले होते. १९५८ साली निर्देशित केलेल्या केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या कायद्यानुसार संरक्षित स्मारके, वास्तु आणि जागाभोवती शंभर मीटर परिघात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास प्रतिबंध होता. परंतु काल दिनांक १७ मे २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा कायदा अंशतः शिथिल करण्यात आला. त्यामळे देशातील १६८६ ठिकाणच्या विकासात्मक कामांचा मार्ग खुला झाला.
या पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाकडे केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री मंत्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाम.देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील, मा.खा.संभाजीराजे छत्रपती, मा खा.धनंजय महाडिकसो, खा.राजू शेट्टीयांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे या रखडलेल्या पुलाचे बांधकाम येत्या ६ महिन्यात पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्यावतीने जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, सुभाष रामुगडे आदींच्या नेतृत्वाखाली या निर्णयाचे स्वागत आनंदोत्सव साजरा करून करण्यात आले. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवाजी पूल येथे दुपाची ४ वाजता फटाके व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना जिल्हा सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, संस्थान काळातील शिवाजी पुलाचे आयुष्यमान संपत आले असताना नवीन पूलाचे बांधकाम पुरातत्व विभागाच्या तांत्रिक अडचणींमुळे थांबले होते. परंतु केंद्र सरकारच्या लवचिक धोरणांमुळे या पुलाचे बांधकाम येत्या सहा महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी दूर होण्यास मोठी मदत मिळणार आहे. कोल्हापूर महानगर भाजपाच्यावतीने पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी, केंदीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री नाम.देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष अभिनंदन याप्रसंगी करण्यात आले. कोल्हापूरकरांच्या मागणीला यामुळे यश आले आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते, आर.डी.पाटील, श्रीकांत घुंटे, सयाजी आळवेकर, सुरेश जरग, अनिल काटकर, नजीर देसाई, अशोक लोहार, राजू सासने, ऑड.संपतराव पवार, सौ किशोरी स्वामी, राजू मोरे, दिग्विजय कालेकर, सुजय मेंगाणे, यशवंत कांबळे, चंद्रमोहन कांबळे, अरुण बारामते, शारुख गाडवाले, प्रसाद मोहिते, अमित माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply