कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मुद्रांक संघाच्यावतीने उद्या रविवारी २१ मे रोजी जुलै २०१७ पासून केंद्र सरकारचा वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी या कराविषयी माहिती देण्यासाठी मेळावा आयोजित केला असून दसरा चौकातील जैन बोर्डिंग येथे सकाळी १० वाजता हा मेळावा होणार असून महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर आणि सरचिटणीस कमलेश धारगळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.कोल्हापूर सेल्स टक्सचे डेप्युटी कमिशनर आणि कर तज्ञ सचिन जोशी हे उपस्थितांना या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच सध्या पायरेटेड सॉफ्टवेअर संदर्भात कंपन्यांनी मोठी शोध मोहीम चालू केली असून डीटीपीसाठी विविध सॉफ्टवेअर वापरणे मुद्रकांना अडचणीचे होत आहे.याविषयी कोरल ड्र कंपनीचे अधिकारी मुद्रकांना उपयुक्त माहिती देतील.अशी माहिती अध्यक्ष प्रदीप पडवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष संजय थोरवत,कार्यवाह सतीश पाध्ये,खजानीस निहाल शिपूरकर,संचालक अभिजित पडवळे,अंजुम तांबोळी,सुनील नसिराबादकर,प्रकाश करंबळकर,आर.डी.पाटील,शरद गोसावी,सुरेश एकशिंगे,सिद्धेश पाटील,रणजीत पोवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply