निसर्गोपचार तज्ञ व्यक्तीला नावामागे डॉक्टर उपाधी लावता येते: डॉ.स्वागत तोडकर यांचा खुलासा

 

कोल्हापूर: निसर्गोपचाराचे शिक्षण घेतलेल्या आणि प्रमाणपत्र मिळवलेल्या व्यक्तीला त्याच्या नावामागे डॉक्टर ही उपाधी लावता येते ते आपली स्वतंत्रपणे प्रैक्टिस करता येते अशी भूमिका आज डॉ.स्वागत तोडकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
कोल्हापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर्सविरुद्ध प्रशासनाचे कारवाईची मोहीम तीव्र केलीय.यात २३९ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या.यात गुन्ह्रे दाखल झालेल्या डॉक्टरांमध्ये डॉ.स्वागत तोडकर यांचे नाव होते.पण शासनाच्या १९६० आणि २०१२च्या जीआर नुसार निसर्गोपचाराचे शिक्षण घेतलेल्या आणि प्रमाणपत्र मिळवलेल्या व्यक्तीला त्याच्या नावामागे डॉक्टर ही उपाधी लावता येते. यामुळे सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्याने डॉ.स्वागत तोडकर यांना मुक्त करण्यात आले. आजवर डॉ.तोडकर यांनी सेवा भावनेने रुग्णांना मोफत उपचार दिलेले आहेत.आणि आजवर हजारो रुग्ण बरे झाले आहेत. यापुढेही हि सेवा अशीच चालू रहाणार आणि मी डॉक्टर ही उपाधी लावणार अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.मी कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता हे काम करत आहे.तरी माझ्याविरुद्ध चुकीची कारवाई झाली होती.असेही ते म्हणाले.पत्रकार परिषदेला डॉ.कोमल पाटील,उदयसिंह जाधव,विनायक जाधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!