
कोल्हापूर: हज यात्रेसाठी जास्तीत जास्त लोकांना जाता यावे यासाठी हजला जाण्यासाठी लागणाऱ्या कोठ्यात वाढ कशी करता येईल यासाठी खासदार म्हणून प्रयत्न करणार असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केल. कोल्हापुरातील हज फौंडेशन च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.या जन्मात एकदा तरी मका आणि मदिना ला जाऊन येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोल्हापुरात शाहू महाराजांचा सामाजिक सलोख्याचा विचार रुजलेला आहे.त्यामुळे जातीय आणि धर्मातील तेढ कोल्हापुरात कधीच निर्माण होणार नाही असेही खासदार महाडिक म्हणाले.
छत्रपती शाहू महाराज यांनी मुल्सिम समाजाबरोबरच सर्व बहुजन समाजातील लोकांसाठी शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. मुस्लीम बोर्डिंगची स्थापना केली.आणि तेंव्हापासून छत्रपती घराणे आणि मुस्लीम समाजाचे जिव्हाळ्याचे नाते आहे.प्रत्येक धर्माने माणुसकी जपली तर जातीय संघर्ष होणारच नाही हीच जाणीव शाहू महाराजांमुळे करवीर नगरीच्या सर्व लोकांना असल्याने इथे जाती,धर्माचा एकोपा आहे.असे प्रतिपादन कोल्हापूरचे युवराज आणि राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
कोल्हापूरातून हज यात्रेसाठी गेलेल्या लोकांसाठी मका मदिना येथे रिबात म्हणजेच ठिकाण किंवा जागा अत्यंत कमी खर्चात मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून सौदे अरेबियन राष्ट्राशी याबाबत बोलावे अशी मागणी काझी मुफ्ती इर्शादुल्लाह मखदुमी कास्मी यांनी खासदार धनंजय महाडिक आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे केली.याबाबत प्रयत्न करू असेही उपस्थित दोन्ही खासदार यांनी सांगितले.
२४० जन हज यात्रेसाठी जाणार आहेत.हे त्यांचे भाग्य आहे.प्रत्येक धर्म हा प्रेम,करुणा आणि त्याग याचीच शिकवण देतो.हज ला जाऊन आलेल्या त्या हाजी चे जीवन सफल होते.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले. कोल्हापूरच्या प्रथम नागरिक महापौर हसीना फरास यांनी हज यात्रेकरूना शुभेच्छा दिल्या.यावेळी हजला जाणाऱ्या मुस्लीम बांधव आणि महिला भगिनी यांना छत्री वाटप केले.
स्वागत हाजी बाबासाहेब शेख यांनी केले.प्रास्ताविकामध्ये पत्रकार समीर मुजावर यांनी हाजी फौंडेशन स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला.यावेळी संचालक बालेचांद म्हालदार, मुस्लीम बोर्डिंगचे गाणीभाई आजरेकर यांच्यासह सदस्य आणि मुस्लीम बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply