कोल्हापूर : जीएसटी कर प्रणालीमुळे आर्थिक विकास दर वाढणार असून काही वस्तूंच्या किमती कमी होतील तर चैनीच्या वस्तूंच्या किमती वाढतील. संपूर्ण राष्ट्रासाठी एकच प्रत्यक्ष कर म्हणजे वस्तू व सेवा कर शासनाच्या वतीने विविध संघटनांना सहभागी करून घेवून जीएसटी कर प्रणालीविषयी जनजागृती करण्यासाठी मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूर जिल्हा मुद्रांक संघाच्यावतीने केंद्र सरकारचा वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी या कराविषयी माहिती देण्यासाठी मेळावा दसरा चौकातील जैन बोर्डिंग येथे आयोजित केला होता. यात मार्गर्दर्शन करताना कोल्हापूर सेल्स टॅक्सचे डेप्युटी कमिशनर आणि कर तज्ञ सचिन जोशी बोलत होते. ० ते २८ टक्के अश्या ५ विभागात ही कर प्रणाली विभागली असून याचा नक्की अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होईल असे ते म्हणाले.
कागदाचे भाव प्रचंड वाढल्याने काही महिन्यात वह्या पुस्तके प्रचंड महाग होणार आहेत. परदेशातून आयात करण्यात असलेल्या कागदावर सरकारने आयात कर लावला आहे पण प्रिंटींग मटेरीयल वर कोणताही कर नाही त्यामुळे भारतातील मुद्रकांनी काय करायचे.त्याचबरोबर सरकारने प्रिंटींग क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापना करावे.नवीन आणि प्रगत तंत्रज्ञान भारतात येणे गरजेचे आहे.यासाठी चायना विद्यापीठातील तंत्रज्ञान शिकण्यासाठी तेथील विद्यापीठाशी चर्चा केली आहे.त्या धर्तीवर सरकारने जमीन किंवा निधी देऊन येथील भावी पिढीस प्रिंटींग मधील प्रगत गोष्टींचे ज्ञान घेणे सोपे जाईल.मुद्रकांसमोर आज अनेक समस्या आहेत.प्रिंटीग हा व्यवसाय सेवा की उत्पादन यात मोडतो याविषयी अजूनही सरकार संभ्रमात आहे या सर्व अडचणीविषयी सरकारशी चर्चा झाली असून याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.अशी मागणी मुद्र्कांची शिखर संस्था असणाऱ्या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स व्यवस्थापकीय सचिव आनंद लिमये यांनी केली.यावेळी प्रास्तविक अध्यक्ष प्रदीप पडवळे यांनी केले.यावेळी उपाध्यक्ष संजय थोरवत,कार्यवाह सतीश पाध्ये,खजानीस निहाल शिपूरकर,संचालक अभिजित पडवळे,अंजुम तांबोळी,सुनील नसिराबादकर,प्रकाश करंबळकर,आर.डी.पाटील,शरद गोसावी,सुरेश एकशिंगे,सिद्धेश पाटील,रणजीत पोवार यांच्यासह सदस्य आणि मुद्रक,ऑपरेटर उपस्थित होते.

Leave a Reply