
हैदराबाद : हैदराबाद येथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या फायनलमधील लढतीत मुंबई इंडियन्सने पुण्यावर मात केली. मुंबई संघ विजयी झाला तर पुणे संघाचा १ धावांनी पराभव झाला.
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा गोलंदाज उनाडकटने सिमन्स आणि पार्थिव पटेलला बाद करीत मुंबई इंडियन्सला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक (४६ धावा) कृणाल पांड्याने केल्या. अंबाती रायडू १२, रोहित शर्मा २४ आणि हार्दिक पांड्याने १० धावा केल्या. मुंबई इंडियन्सला २० षटकात ८ बाद १२९ धावा करता आल्या. मुंबई इंडिन्सने ठेवलेल्या १३० धावांचा पाठलाग करताना सुरूवात चांगली झाली परंतु नंतर खेळी अपयशी ठरत पराभव झाला. अजिंक्य राहणे ४४ धावा, महेंद्रसिंग धोनी १० तर स्मिथने सर्वाधिक नाबाद ५१ धावा केल्या. एका चेंडून ४ धावांची गरज होती परंतु ती करता न आल्याने पुण्याला एका धावेने पराभव पत्कारावा लागला.
Leave a Reply