
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानायक अमिताभ बच्चन यांचे देशभरातच नव्हे, जगभरातच चाहते आहेत अनेकांचे लहानपणापासून अमिताभ बच्चन आवडते हिरो आहेत, अनेकजण लहानपणापासून बच्चनप्रमाणेच जगले आहेत, अनेक जण बच्चन सारखेच वागले, बोलले आणि त्यांच्या चित्रपटातील कपड्यांसारखे कपडे शिवून घातले, तर त्यांच्या सारखेच केससुद्धा वाढवलेले आपण कोल्हापुरात खूप पहिले आहेत. अशाच बच्चनप्रेमींसाठी ‘बच्चन वेडे कोल्हापुरी’ या वॉट्सअप ग्रुपतर्फे रविवार दि. २८ रोजी कोल्हापुरातील अयोध्या हॉटेलमध्ये बच्चन महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती ग्रुपचे अॅडमिन सुधर्म वाझे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, कोल्हापूरच्या सर्व बच्चनप्रेमी आणि बच्चन वेड्यांसाठी कोल्हापुरात एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी सायंकाळी ४ ते रात्री ८ पर्यंत या स्पर्धा हॉटेल अयोध्या इथे पार पडणार आहेत. या स्पर्धेत बच्चन यांची गाणी, संवाद, त्यांच्यासारखी वेषभूषा तसेच बच्चन नृत्याची ही स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापुरातील प्रत्येक चाहत्याने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन ‘बच्चन वेडे कोल्हापुरी’ या ग्रुपचे सुधर्म वाझे यांनी केले.
अमिताभ बच्चन यांच्यावर जिवापाड प्रेम करणारा चाहतावर्ग देशभरात आहे, तसाच तो कोल्हापुरातही आहे. असेच काही चाहते “व्हॉटस् अॅप ग्रुप‘च्या माध्यमातून एकत्र आले असून शंभर सभासद या ग्रुपवर आहेत. प्रत्येक आठवड्यात बच्चन यांच्याविषयी विविध संकल्पनांवर आधारित उपक्रम हा ग्रुप व्हॉटस् अॅपवर चालवतो. विविध चित्रपटांतील गाणी, डायलॉग्ज असोत किंवा शीर्षकगीते ग्रुपवर शेअर केली जातात. एकेका दिवसाला हजारहून अधिक पोस्ट पडतात.
एकूणच बच्चन आणि त्यांच्या चित्रपटांना एन्जॉय करणे, हाच या ग्रुपचा मुख्य उद्देश असून दररोज रात्री नऊ ते बारा या वेळेत ‘बच्चन सॉंग्ज‘ हा उपक्रम चालतो. या वेळेत फक्त बच्चन यांची गाणीच ग्रुपवर शेअर होतात. या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी मो. क्र. ९४२२४१९७९० वर किंवा हेमंत स्टोअर्स शिवाजी रोड येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेस विश्वनाथ कोरी,प्रा. किरण पाटील, प्रसाद जमदग्नी, राजू नान्द्रे, सूरज नाईक, सचिन मणियार यांच्यासह बच्चन प्रेमी उपस्थित होते.
Leave a Reply