कोल्हापुरात उमा टॉकीज जवळ एस. टी चा भीषण अपघात; 2 जण ठार

 

कोल्हपूर : कोल्हापूर शहरातील उमा टॉकीज चौकात झालेल्या भीषण अपघातात २ जण ठार त्यांची नावे देवास घोसरवाडे रा. कड़गांव आणि सुहास पाटील रा. उचगांव हे मयत झाल्याचे वृत्त आहे.आणि ९जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने ५ दुचाकी आणि दोन टाटा सुमो आणि एका मारुती व्हॅनला धडक दिली. एसटी चालकाला ह्दयविकाराचा झटका आल्याने त्याचे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने आठ गाड्यांना धडक दिली. अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत. ओढ्यावरचा गणपती मार्गावरून एसटी बस उमा टॉकीज चौकाकडे येत असताना चालकाला ह्दयविकाराचा झटका आला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बसने गणपती मंदिरापासून ते उमा टॉकीज चौकापर्यंत अनेक गाड्यांना धडक दिली. एसटी बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या गाड्यांना धडक दिली. त्यानंतर बस एका सिग्नलला जाऊन आदळली. ह्दयविकाराचा झटका आलेल्या एसटी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे यामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली.जखमीना सीपीआर मधे दाखल करण्यात आले असून चालक सहदेव कांबळे याच्यावरही उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!