कोल्हापूर : “जय महाराष्ट्र” हे घोषवाक्य महाराष्ट्राची शान आणि मराठी माणसांच्या अस्मितेचे ब्रीद आहे. त्यामुळे कर्नाटक काय जगभराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मराठी माणसाला “जय महाराष्ट्र” म्हणण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कानडी सरकार कडून सीमा बांधवावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू नये, मराठी माणसांचा अंत पाहू नका, अन्यथा कन्नडिगांची पळताभोई थोडी होईल, असा इशारा आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे. कर्नाटक नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी कर्नाटकातील लोकप्रतिनिधीनी “जय महाराष्ट्र” चा नारा दिल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यामुळे सीमाभागात संतापाची लाट उसळली असून, कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने कर्नाटक नगरविकास मंत्री रोशन बेगच्या वक्तव्याचा निषेध करीत त्याच्या पुतळ्याचे आज छ. शिवाजी चौक येथे दहन केले.
सकाळी अकराच्या सुमारास छ. शिवाजी चौक येथे शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, “अभिमानाची गोष्ट, जय महाराष्ट्र”, “रोशन बेगचे करायचे काय खाली डोक वर पाय” “कर्नाटक शासनाचा धिक्कार असो” यासह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी छ. शिवाजी चौक परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, आधी कन्नड रक्षक वेदिकेच्या गुंडान कडून सीमा बांधवांवर अत्याचार होत होते. कर्नाटक पोलीसही कानडी गुंडाच्या क्रूरकृत्यास साथ देत. आता कर्नाटक शासनातील मंत्रीच “जय महाराष्ट्र” च्या नाऱ्यास विरोध करत असल्याने कर्नाटक शासन देखील महाराष्ट्र द्वेषी असल्याचे दिसून येत आहे. “जय महाराष्ट्र” हा नारा मराठी माणसाचा हक्क असून, भारतीय लोकशाही घटनेने दिलेल्या नागरी हक्कावर कोणीही गदा आणू शकत नाही. या कानडी सरकारी मंत्री महोदयाना मराठी माणसाचा इतिहास माहित नाही. अंगावर आल्यावर शिंगावर घेण्याची तयारी टाकत मराठी माणसांच्यात आहे. पिसालेल्या जनावराप्रमाणे माज या कर्नाटकी सरकारला आला असून मराठी माणसांवर होणाऱ्या प्रत्तेक घावाचा बदला घेतला घेऊन कर्नाटकी सरकारचा माज शिवसैनिक उतरवतील. सीमा भागातील मराठी माणसावर दडपशाही करण्याचे प्रकार कोल्हापूर शिवसेनेने अनेक वेळा उधळून लावले असून, कानडी गुंड कोल्हापुरातून पळवून लावले आहेत. शिवसेना सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठाम असून, मराठी माणसाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये, अन्यथा कन्नडिगांची पाळताभोई थोडी होईल याचे कर्नाटकी मंत्री महोदयांनी भान ठेवावे, असा इशाराही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला.
या वेळी शिवसेनेचे दीपक गौड, संजय गांधी समिती अध्यक्ष किशोर घाटगे, जयवंत हारुगले, रणजीत जाधव, विशाल देवकुळे, सुनील जाधव, दीपक चव्हाण, अमित चव्हाण, तुकाराम साळोखे, अजित गायकवाड, सुनील खोत, रमेश खाडे, विजय देसाई, युवा सेना शहरप्रमुख चेतन शिंदे, पियुष चव्हाण, अविनाश कामते, माथाडी कामगार सेना शहरप्रमुख राज जाधव, गजानन भुर्के, शाम जाधव, सुनील भोसले, अश्विन शेळके, सागर घोरपडे, सुनील करंबे, राजू काझी, विनय वाणी, सचिन भोळे, पद्माकर कापसे, अमर क्षीरसागर, राजू ढाले, कपिल सरनाईक, ओमकार परमणे, उदय भोसले, शिवाजी सावंत, महादेव पोवार, किरण पाटील, हर्षल पाटील, गजानन तोडकर, दिनेश साळोखे, सौरभ कुलकर्णी, यशवंत पाटील, यांच्या सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply