
मराठी चित्रपटसृष्टीला कॉमेडीचा मोठा इतिहास आहे. अनेक विनोदी चित्रपटांतून सकस आणिमनोरंजक विनोद प्रेक्षकांनी अनुभवला. काही चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. विनोदीचित्रपटांची ही परंपरा पुढे चालवत नव्या पिढीची भाषा बोलणारा, नव्या पिढीचे बोल्ड विचारमांडणारा आणि ब्लॅक कॉमेडीचा खमंग तडका असलेला ‘घंटा’ हा चित्रपट स्टार प्रवाहवर पाहतायेणार आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २८ मे रोजी दुपारी १ आणि सायं. ७ वाजतापाहता येणार आहे. अमेय वाघ, सक्षम कुलकर्णी, आरोह वेलणकर या नव्या पिढीच्या अभिनेत्यांनीया चित्रपटात धमाल केली आहे.घंटा’ या सिनेमात तीन अतरंगी मित्र राज, उमेश आणि अंगद यांची कथा आहे. वेगवेगळ्यास्वभावाचे हे तीन मित्र एकत्र मुंबईत राहतात. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ते धडपडत आहेत.पण त्यांना हवं तसं काम मिळत नसल्याने पैशांची अडचण आहे. त्यामुळे वेगळ्या पद्धतीनं ते पैसेमिळवण्याच्या मागे लागतात आणि गोत्यात येतात. त्यातून सुटका करून घेताना त्यांची जी काहीअवस्था होते, त्याचं धमाल चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. शैलेश काळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अमेय वाघ, सक्षम कुलकर्णी, आरोह वेलणकर,अनुजा साठे यांच्यासह पुष्कर श्रोत्री, किशोर कदम असे अनुभवी कलाकारही आहेत. त्यामुळेउत्तम अभिनयाची मेजवानी या चित्रपटात आहे. वेगळ्या पद्धतीची मांडणी, दमदार गाणी आणिउत्तम ग्राफिक्स हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिलाहोता. नव्या धाटणीचा चित्रपट म्हणून त्याचं कौतुक झालं होतं.
नव्या पिढीची धमाल आणि ब्लॅक कॉमेडीचा तडका असलेला हा चित्रपट २८ मे रोजी दुपारी १आणि सायं ७ वाजता नक्की पहा फक्त स्टार प्रवाहवर.
Leave a Reply