
कोल्हापूर: जगातील पहिले पत्रकार म्हणून ज्यांना मानले जाते असे देवर्षी नारद मुनी. याचेच औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व संवाद केंद्राच्यावतीने देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने उद्या शाहू स्मारक येथे पत्रकार सन्मान दिवस साजरा करण्यात येणार आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मानाचा दिवस.यावेळी पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालायचे वृत्तपत्र व संवादशास्त्र विभाग प्रमुख विनय चाटी मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार असून पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक भगतराम छाबडा यांनी केले आहे.
Leave a Reply