
कोल्हापूर: सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदू राष्ट्र स्थापनेचे प्रणेते गुरु डॉ.जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त हिंदू जनजागृती समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात २८ मे रोजी भव्य हिंदू एकता दिंडी काढण्यात येणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता मिरजकर तिकटी येथून या दिंडीस प्रारंभ होईल.तिथून बिनखांबी गणेश मंदिर,पापाची तिकटी मार्गे ही दिंडी शिवाजी चौकात येऊन तिथे तिची सांगता होणार आहे.यात विविध सामाजिक ,देशभक्त आणि धार्मिक संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते ’एक हिंदू’ म्हणून सहभागी होणार आहेत. हिंदूंच्या सामाजिक राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवर हिंदू राष्ट्राची स्थापना हाच एकमात्र उपाय आहे असा विचार गुरु डॉ.आठवले यांनी सर्वप्रथम मांडला.त्यांनाच अभिवादन करण्यासाठी या दिंडीचे आयोजन केले आहे अशी माहिती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक मनोज खाडये यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.पत्रकार परिषदेस सनातन संस्थेच्या डॉ.सौ.शिल्पा कोठावळे,हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्षा सौ.दिपाली खाडे,हिंदू जनजागृती समितीचे मधुकर नाझरे,पतित पवन संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील शिवसेना उपजिल्हाध्यक्ष संभाजीराव भोकरे यांच्यासह सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply