
कोल्हापूर: येत्या ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा दिन आहे. याला ३४४ वे वर्ष सुरु होत आहे. याचेच औचित्य साधून मराठा महासंघ यांच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक व्याख्यानमाला २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे.शाहू स्मारक भवन येथील मिनी सभागृह येथे ३१ मे ते २ जून दरम्यान ही व्याख्यानमाला होणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ३१ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रा.डॉ आनंद पाटील यांचे महाराष्ट्राला माहिती नसणारे शिवाजी महाराज, १ जून रोजी डॉ.प्रकाश पवार यांचे छत्रपती शिवाजी महाराज ;प्रतिमा व राजकीय व्यवहार आणि २ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे मूळ व परिणाम या विषयावर डॉ.राजेंद्र कुंभार यांचेव्याख्यान होणार आहे. तसेच वृक्षारोपण ,शिवरायांच्या आकर्षक तैलचित्राचे प्रकाशन हे ही कार्यक्रम होणार आहेत. यासेच ६ जून रोजी भव्य मिरवणुक सोहळ्यास मराठा महासंघ कार्यालय येथे सायंकाळी ४.३० वाजता प्रारंभ होईल.यासाठी खासदार,आमदार,महापौर,इतिहास संशोधक,नगरसेवक आणि मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शिवाजी चौक येथे मिरवणुकीची सांगता होणार असून यात विविध राष्ट्र पुरुषांचे फलक,सामाजिक प्रबोधनात्मक फलक,धनगरी ढोल,लेझीम अशी पारंपारिक वाद्यांच्या आणि वेशभूषेसह ही मिरवणूक सर्वांचे आकर्षण बनेल.तसेच वाजवी खर्चास फाटा देऊन त्याचा विनियोग सामाजिक उपक्रमासाठी करण्यात येणार आहे.पत्रकार परिषदेस इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, महिला जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले,अवधूत पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply