
कोल्हापूर: संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या कामास सुरुवात केली आहे.पण ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे की ठेकदार आणि अधिकारी यांच्या फायद्याची आहे असा सवाल आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.आज शेतकरी पाऊस नाही म्हणून पिक नाही आणि कर्जाच्या बोजाला कंटाळून आत्महत्या करत आहे.याच शेतकऱ्याला दिलासा मिळावा म्हणूनही योजना सरकार राबवत आहे.पण एकूणच कोट्यावधी रुपयांच्या या कामात संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने निकृष्ठ दर्जाचे काम करून शेतकऱ्यांच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार चालविला आहे.याविरोधात पहिल्या टप्प्यात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करणार आणि येत्या १० दिवसात जिल्हाधिकारी यांनी या कामाच्या चौकशीसाठी हे प्रकरण जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे सोपवण्यासाठी निवेदन दिले जाणार आहे.तसेच त्यातूनही न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचेही संजय पवार यांनी सांगितले.
गगनबावडा तालुक्यातील बोगस कामाचे भांडाफोड शिवसेनेने केल्यानंतर तेथील कृषी अधिकारी यांनी उलट युवा सेना जिल्हाध्यक्ष हर्षल सुर्वे यांच्यावर 3 लाख रुपये दिल्याचा बिनबुडाचा आरोप केला.कोणताही शिवसैनिक पैशाच्या अमिषाला कधीच बळी पडणार नाही असे हर्षल सुर्वे यांनी सांगितले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांचा अहवाल जाहीर करावा,संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन झालेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे,शिवाजीराव जाधव यांच्यासह शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply