
कोल्हापूर: कोल्हापूररस्तेसौंदर्यीकरणप्रकल्प (Kolhapur Street Beautification Project) म्हणजेच केएसबीपीया धर्मादाय संस्थेने कोल्हापुरातील १५ किमीचे रस्ते, विविध चौक व ट्रॅफिक आईलँडयांचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण अतिशय सुंदर प्रकारे केले आहे.शासकीय संस्था उदाहरणार्थ महानगरपालिका, जिल्हापरिषद व धर्मादाय तसेच अशासकीय संस्था एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी पार्टनरशिप/करार करू शकतात. ज्याला पब्लिक प्रायव्हटे पार्टनरशिप असे म्हंटले जाते. कोल्हापूरमहानगरपालिका व केएसबीपी आता पब्लिक प्रायव्हटे पार्टनरशिपद्वारे एकत्र येत असून तसासामंज्यस्य करार करत आहेत. राष्ट्रीय पातळीच्या काही अशा सकीय संस्था अशाच प्रकारे केएसबीपीबरोबर एकत्र येऊन काही चौक विकसित करण्यास इच्छुक आहेत. या सर्वांचा योग्य समन्वय साधण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका केएसबीपीला सुशोभीकरण झालेल्या व होणाऱ्या सर्व चौक व ट्रॅफिक आईलँडसाठी अशासिकीय संस्थाबरोबर करार करण्याची परवानगी देत आहे. इच्छुक अशासकीय संस्था केएसबीपीबरोबर करार करून चौक किंवा ट्रॅफिक आई लँडदत्तकतत्वावर घेउन आपल्या संस्थेचानामफलक तेथे लावतील व व कोल्हापूर शहराच्या सौंदर्यीकरणास मोलाचा हातभार लावतील आणि केएसबीपीकडून त्या जागेची देखभाल केली जाईल. मागील दहा महिन्यांपासून केएसबीपीकडून १५ किमी चे रस्ते, विविध चौक व ट्रॅफिक आईलँडयांची योग्य प्रकारे देखभाल करण्यात येत आहे.
रंकाळातलावयासाठी केएसबीपी व कोल्हापूर महानगरपालिका एकत्रित पणे “रंकाळातलाव विकास समिती” स्थापन करणार आहेत. रंकाळातलाव विकास समिती तर्फे रंकाळा तलावाचा संपूर्ण नवीन विकास आराखडा महानगरपालिकेस सादर होणार असून त्याची अंमलबजावणी समितीच्या देखरेखे खाली होणार आहे.
Leave a Reply