
कोल्हापूर: भारतात २ लाख लोकांना डोळ्यांची आवश्यकता आहे.पण फक्त ५० हजार डोळे लोकांसाठी उपलब्ध होतात.दरवर्षी ८० लाख लोकांचा मृत्यू होतो पण मयात लोकांच्या नातेवाईकांच्या काही चुकीच्या गैरसमजुतीमुळे लोक डोळे दान करण्यास नकार देतात. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे.कन्सर,कावीळ आणि एचआयव्ही झालेले व्यक्ती सोडून बाकी सर्व जन नेत्रदान करू शकतात.आणि अश्या प्रकारे नेत्रदानाची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहणे गरजेचे आहे अशी अपेक्षा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ आणि मुंबईतील जे.जे.हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली.कोल्हापूर प्रेस क्लब आयोजित वार्तालापात ते बोलत होते.अवयव दान हे खूप मोठे काम आहे.रक्तदानाप्रमाणे इतर अवयवांची दातृत्वाची जाणीव लोकांमध्ये झाली पाहिजे.मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचे डोळे सहा तासाच्या आत ज्यांना गरज आहे त्यांना दिले तर त्या व्यक्तीचे आयुष्य बदलून जाईल असेही ते म्हणाले.
त्याचप्रमाणे 1 ते 6 वर्षाच्या लहान मुलांना मोबाईल देऊ नये त्यामुळे त्यांचे डोळे लवकर खराब होतील,सारखे कॉम्प्यूटरवर काम करणाऱ्या व्यक्तींनी 4 इंच कॉम्प्युटर नजरेच्या खाली ठेवावा,सकाळ आणि संध्याकाळी डोळे थंड पाण्याने धुवावेत,आपल्या हातावर जंतू असतात त्यामुळे त्याचा स्पर्श डोळ्यांना होऊ देऊ नये असे डोळे चांगले ठेवण्यासाठी काही उपायही त्यांनी पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारताना सांगितले.वैद्यकीय क्षेत्रात काम करताना गरिबांना मदत झाली पाहिजे याला नेहमी प्राधान्य दिले.अश्या सामाजिक सेवेत सातत्य ठेवले पाहिजे असेही ते म्हणाले.प्रास्ताविक प्रेस क्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी केले.आभार उपाध्यक्ष तानाजी पोवार यांनी मानले.यावेळी प्रगती नेत्र रुग्णालयाचे डॉ.जोगळेकर,कार्यकारीणीचे संचालक,सर्व प्रसारमाध्यम यांचे पत्रकार,छायाचित्रकार उपस्थित होते.
Leave a Reply