जम्मू काश्मीर आणि लष्कराचे अतूट नाते: अभ्यासक व पत्रकार विनय चाटी

 

कोल्हापूर: काश्मीर हा भारताचे अविभाज्य अंग आहे.त्यामुळे पाकिस्तानने जे काश्मीरसाठी तिथे आक्रमणे केली ती संपूर्ण बेकायदा आहेत.यात काश्मीरमधील सर्वात जास्त जवान मारले गेले आहेत आणि परमवीर चक्र हा बहुमान सर्वात जास्त काश्मीरमधील जवानांना अधिक मिळालेला आहे त्यामुळेच जम्मू काश्मीर आणि लष्कराचे अतूट नाते आहे असे प्रतिपादन अभ्यासू पत्रकार आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील वृत्तपत्र आणि संवादशास्त्र विभाग प्रमुख विनय चाटी यांनी केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व संवाद केंद्र यांच्यावतीने देवर्षी नारद जयंतीनिमित्त आयोजित पत्रकार सन्मान दिवस कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.पत्रकारिता आणि सरंक्षण याविषयावर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.काश्मीर मधील ५५ लाख लोकसंख्येपैकी फक्त १ लाख २० हजार सुन्नी बहामी लोकांना काश्मीर हा भारताचा भाग नसून पाकिस्तानात असावा असे वाटते.भारतीय लष्कर हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे लष्कर आहे.भारतीय जवान हे अतिशय कठीण परिस्थितीत देशाचे सीमेवर रक्षण करत असतात.अतिशय आव्हानात्मक आणि विपरीत परिस्थितीला तोंड देत असतात.आज काश्मीर मध्ये एका दिवसाला लष्करावर ७ कोटी रु खर्च होतात.या सतर्क यंत्रणेमुळे आज आपण सुरक्षित आहोत.मनावी अधिकारांचे उल्लंघन केले असे आरोप लष्करावर होत असतात पण ऑपरेशन सद्भावना याखाली काश्मीर मध्ये ४२ निवासी शाळा चालविल्या जातात जिथे १२ हजार विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत.अश्या प्रकारचे अनेक मानवी चेहरा असणारी कामे लष्कर या भागात करत आहे.सर्जिकल स्ट्राईक मुले पाकिस्तानचे मनोधैर्य नक्कीच खचले आहे.असेही विनय चाटी यांनी सांगितले.पत्रकारांनी खरच जम्मू आणि काश्मीर येथे जाऊन सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेतले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.प्रास्ताविक करताना नारद मुनी यांना आद्य पत्रकार मानले जाते.पत्रकारच फक्त कोणत्याही गोष्टीवर अभ्यासू भाष्य करु शकतात.अशी भूमिका संघाचे जिल्हा प्रचार मंडळ प्रमुख अनिरुद्ध कोल्हापुरे यांनी मांडली.यावेळी विविध प्रसारमाध्यमातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!