
कोल्हापूर: ‘सैराट’ मुळे घराघरात पोहचलेला परश्या म्हणजेच आकाश ठोसर याचा महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘फ्रेन्डशिप अनलिमिटेड’ हा नवीन चित्रपट येत्या 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने चित्रपटाची संपूर्ण टीम आज कोल्हापुरात आली होती.सर्वानीच कोल्हापुरकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.तरुणाईला लक्ष्यात घेऊन महेश मांजरेकर यांनी हा चित्रपट बनविला आहे.कॉलेजमधील एका रॉक बँड मध्ये गाणाऱ्या मुलाची भूमिका आकाश यात सकारात आहे.यामुळे त्याचा वेस्टर्न लुक दाखविण्यात आला आहे.बोल्ड लुक मध्ये अभिनेत्री संस्कृती बालगुडेची झलक यात असणार आहे. तसेच या चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे आकाश चा अजून एक वेगळा लुक तो म्हणजे रॉक बँड मधील गिटारिस्ट आणि बॉक्सर अश्या दोन लुक मध्ये चाहते आपल्या आवडत्या परश्याला पहाणार आहेत.महेश मांजरेकर यांचा परम मित्र सलमान खान याने या चित्रपटात एक गाणे गायले आहे.सचिन खेडकर,शरद पोंक्षे,बोमन इराणी,भारती आचरेकर,ईशा कोप्पीकर,सत्या मांजरेकर यांच्याही वैशिष्ट्यपूर्ण भूमिका यात असणार आहेत. माझा यात वेगळा लुक आणि दोस्तीची धम्माल एन्जॉय करण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा असे आकाश ठोसर याने स्पीड न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
Leave a Reply