
कोल्हापूर : महानायक अमिताभ बच्चन यांचे देशभरातच नव्हे, जगभरातच चाहते आहेत अनेकांचे लहानपणापासून अमिताभ बच्चन आवडते हिरो आहेत, अनेकजण लहानपणापासून बच्चनप्रमाणेच जगले आहेत, अनेक जण बच्चन सारखेच वागले, बोलले आणि त्यांच्या चित्रपटातील कपड्यांसारखे कपडे शिवून घातले, तर त्यांच्या सारखेच केससुद्धा वाढवलेले आपण कोल्हापुरात खूप पहिले आहेत. अशाच बच्चनप्रेमींसाठी ‘बच्चन वेडे कोल्हापुरी’ या वॉट्सअप ग्रुपतर्फे आज कोल्हापुरातील अयोध्या हॉटेलमध्ये बच्चन चाहत्यांचे स्नेहसंमेलन आयोजन केले होते.आज आमदार राजेश क्षीरसागर आणि डॉ.सतीश पत्की यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे उद्घाटन केले.
या स्पर्धेत बच्चन यांची गाणी, संवाद, त्यांच्यासारखी वेषभूषा तसेच बच्चन नृत्याची ही स्पर्धा आज पार पडली.यामध्ये दादासो जामदार,ओके ब्युटी पार्लरचे मनोहर झेंडे, राजू वेढे,श्रीकांत घोडके यांनी आपले अनुभव सांगितले.बच्चन यांच्या गाण्यांवर अनेकांनी नृत्ये सादर केली.संपूर्ण वातावरण बच्चनमय झाले होते.अमिताभ बच्चन यांच्या ७५ व्या वर्षात पदार्पण यानिमित्त हे संमेलन आयोजित केले होते.यावेळी बच्चन यांचे फोटो,कॅलेंडर यांचे वाटप राजू वेढे यांनी केले. यावेळी ग्रुप एडमिन सुधर्म वाझे,दीपक घारगे,प्रकाश मेहता, सचिन लीन्ग्रज, डॉ.गीता पिलई, विश्वनाथ कोरी,प्रा. किरण पाटील, प्रसाद जमदग्नी, राजू नान्द्रे, सूरज नाईक, सचिन मणियार यांच्यासह बच्चन प्रेमी आणि चाहता वर्ग उपस्थित होता.
Leave a Reply