
अनेक मालिका, चित्रपटांतून लोकप्रिय असलेला अभिनेता आशुतोष कुलकर्णी स्टार प्रवाहच्या लेक माझी लाडकी’ या मालिकेत दाखल होत आहे. डॉ. ऋषिकेश धर्माधिकारी ही व्यक्तिरेखा तोसाकारणार आहे. त्याच्या या व्यक्तिरेखेमुळे कथानकात नवे गुंते निर्माण होतात, की नात्यांबाबतउभ्या राहिलेल्या प्रश्नांची उकल होते, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
लेक माझी लाडकी’ या मालिकेनं महाराष्ट्राला नात्यांच्या नव्या प्रवाहात नेलं आहे. मालिकेच्याकथानकात नात्यांचा मोठा गुंता निर्माण झाला आहे. एकीकडे मीरासाठी स्थळं पहिली जातआहेत, साकेत सानिका आणि मीरा यांच्यात अडकला आहेत. तसंच इरावती, आदित्य आणिजयदेव यांच्यातही वेगळा संघर्ष सुरू आहे. या परिस्थितीत फिजिओथेरपिस्ट असलेल्या डॉ.ऋषिकेश धर्माधिकारीचा या कुटुंबात प्रवेश होतो. अपघातात पाय दुखावलेल्या जयदेववर तोउपचार करतो. मात्र, त्याच्या येण्यानं मालिकेच्या कथानकाला वेगळं वळण मिळणार आहे. मात्र,या घरात येण्यामागे डॉ. ऋषिकेशचा काही हेतू आहे का, हे पहाणं रंजक ठरणार आहे.
डॉ. ऋषिकेशच्या येण्यानं मीरा, साकेत, सानिका, इरावती, जयदेव, आदित्य यांच्यात काय घडतं, हेजाणून घेण्यासाठी नक्की पहा ‘लेक माझी लाडकी’ रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर !
Leave a Reply