
कोल्हापूर :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज रंकाळा परिसर व इराणी खण परिसरात महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी 100 वृक्षंाचे रोपण करण्यात आले. यामध्ये कैलाशपती, कांचन, तबोबीया, प्लॅटोफाम, वड, पिंपळ, उत्तरांजो इत्यादीसह विविध प्रकारच्या झाडांच्या जाती लावण्यात आल्या.
तसेच संपुर्ण कोल्हापूर शहरात 3000 वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले असून खड्डे मारण्याचे काम सुरु आहे. सदरचे 3000 वृक्ष शहरात ओपनस्पेस, रस्त्याच्या दोन्ही बाजूस लावण्यात येणार आहे.
यावेळी महापौर सौ.हसिना फरास यांनी बोलताना जगासमोर ग्लोबल वॉर्मिंगचे मोठे संकट असून यावर सर्वांच्या प्रयत्नातून मात करु शकतो. यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावावी, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी रंकाळा व इराणी खण परिसरात लावलेल्या या वृक्षांची देखभाल करणेची जबाबदारी क्रिडाई संस्था उचलत असलेचे अध्यक्ष महेश यादव यांनी सांगितले.
यावेळी आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, सहाय्यक उद्यान अधिक्षक निशिकांत कांबळे, क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव, विद्यानंद बेडेकर, रवि माने, संदिप मिरजकर, सचिन ओसवाल, अजय कोराणे, प्रदिप भारमल, विʉाजीत जाधव, प्रकाश येवलापूरकर सहाय्यक पर्यावरण अभियंता विराज कोप व मोठया संख्येने नागरीक / कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply