
कोल्हापूर:महाराष्ट्रात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने आज न्यायालयीन कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 3000 वकिल न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहतील.
विशेष म्हणजे १ महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर न्यायालयीन कामकाजाचा आज पहिला दिवस आहे. सहा जिल्ह्यांतर्फे चालवण्यात येणार्या कोल्हापूरच्या खंडपीठ आंदोलनात शेतकरी संघटना नेहमी अग्रेसर राहिली आहे. शेतकर्यांच्या आंदोलनाकडे करण्यात येणारे दुर्लक्ष अन्यायकारक आहे, असे मत यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केले. तसेच या संपात ज्यांच्यावर गुन्हे दाखल होतील त्यांच्या खटले आम्ही एकही पैसा मोबदला न घेता लढवू असा निर्धार यावेळी सर्व वकिलांनी केला.
Leave a Reply