
कोल्हापूर :- श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र आराखडयाची माहिती महापालिका पदाधिकारी व नगरसेवकांना व्हावी यासाठी आज केशवराव भोसले नाटयगृह येथे तीर्थक्षेत्र आराखडयाचे सादरीकरण संपन्न झालेे. महापौर सौ.हसिना फरास यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
प्रारंभी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी प्रास्ताविकात शहरात येणाऱ्या भाविक / पर्यटक यांना आवश्यक सोयी सुविधा पुरविणे कामी तसेच शहरातील रस्त्यावरील सांभाव्य गर्दी व वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करणेकरीता महालक्ष्मी मंदिराच्या पुरातन ऐतिहासीक वास्तुचे जतन व संवर्धन करणे कामी तसेच मंदिराचे व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कोल्हापूर महानगरपालिकेकडून रक्कम रुपये 255.00 कोटीचा प्रारुप विकास आराखडा पालकमंत्री यांची दिलेल्या निर्देशाअन्वये कामाच्या निकडी नुसार तीन टप्प्यात तयार करणेत आला आहे.
. पालकमंत्री, कोल्हापूर व स्थानिक आमदार महोदयांनी केलेल्या सुचनांप्रमाणे आवश्यक कामांचा समावेश पहिल्या टप्प्यात करणेत आलेला असुन त्या करीता रक्कम रु. 72.00 कोटी प्रस्तावित करणेत आले आहेत. आवश्यक सुधारणा करणे करीता व भाविकांना सुविधा देणे करीता मंदिर परिसरातील भु-संपादन करणे आवश्यक आहे. सदर भु-संपादनामध्ये परिसरातील रहिवास व व्यापारी संकुल बाधित होणार आहेत. त्यांचे योग्य ठिकाणी पुर्नवसन करणे आवश्यक आहे. सदर कामास विलंब लागणार असलेने त्याचा दुसऱ्या टप्प्यामध्ये समावेश करणेत आला असुन त्याकरीता रक्कम रु. 166.00 कोटीचा निधि प्रस्तावित केला आहे.
शहरात येणाऱ्या भाविकांना होणारा संभाव्य गर्दीचा तसेच वाहतूकीचा त्रास कमी होवुन देवदर्शन सुलभ व्हावे या करीता उड्डान पुल व रस्ते सुविधा प्रस्तावित करणेत आल्या आहेत. त्याच बरोबर कोल्हापूर शहराचे ऐतिहासीक व धार्मिक बाबींचा उलघडा येणाऱ्य पर्यटकांना होणे करीता 10 मिनिटांची माहितीपट (डॉक्युमेंट्री फिल्म) तसेच सिडी उपलब्ध करुन देणेचे नियोजन केले आहे. तसेच शहरातील ऐतिहासीक वास्तुचे सौंदर्य खुलविणे कामी प्रकाश व ध्वनी व्यवस्था वापर करुन घेणेचे प्रस्तावित केले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकुण कामाकरीता रक्कम रु. 67.00 कोटीचा निधि प्रस्तावित केला आहे. मा.विभागीय आयुक्त, पुणे यांनी सदर प्रथम प्रधान्याने करावयाच्या टप्पा क्र.1 च्या अंदाजपत्रकीय रक्कम रु.68.00 कोटीच्या कामांना मान्यता होणेकामी सदरचा प्रस्ताव राज्य शासनास सादर केला आहे असे सांगितले.
महापौर सौ.हसिना फरास यांनी तीर्थक्षेत्र विकासामध्ये होणाऱ्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये तसेच कामावर लक्ष राहणेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची समिती नेमावी. या समितीमध्ये महापौर, उपमहापौर, सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता, सर्व पक्षाचे गटनेते व स्थानिक नगरसेवक यांचा समावेश असावा अशी सुचना केली. या समितीची दर महिन्याला आढावा बैठक घेण्यात येईल असे सांगितले.
सादरीकरणानंतर नगरसेवकांनी सुचना मांडल्या. यामध्ये सभागृहनेता प्रविण केसरकर यांनी सदरच्या कामावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची देखरेख असावी. कामाचा दर्जा चांगला असावा असे सांगितले. गटनेता शारंगधर देशमुख यांनी शिवाजी चौकातील शिवाजी मार्केटची इमारत रिडेव्हलप करुन त्याठिकाणी अद्ययावत पार्किगसह प्रशस्त इमारत उभी करणेसाठी या आराखडयामध्ये तरतुद करणे आवश्यक आहे. महाद्वार हे महालक्ष्मी मंदीराचे प्रवेशद्वार असलेने स्थानिक नागरिक या दरवाज्यातून दर्शनासाठी येतात. या दरवाजातून फक्त बाहेर जाणेसाठी मार्ग ठेवलेस स्थानिकांची गैरसोय होणार आहे त्यामुळे महाद्वारातून प्रवेश बंदी नको असे सांगितले. गटनेता विजय सुर्यवंशी यांनी सदरचा आराखडा कागदावर न राहता प्रत्यक्षात अंमलात यावा. बिंदू चौकात सबजेल असलेने व हेरिटेज वास्तू असल्याने त्याठिकाणी मल्टीलेव्हल कार पार्किंग बांधता येईल का याचा आत्ताच विचार करण्यात यावा. व्हिनस कॉर्नर येथील गाडी अड्डा येथे बांधण्यात येणारे भक्त निवास वेगळे व पार्किंगची व्यवस्था वेगळी करण्यात यावी. सदरचा आराखडा परिपुर्ण व सर्वसमावेशक असावा असे सांगितले.
Leave a Reply