
कोल्हापूर : मोबाईल आणि व्हिडीओ गेम्स यांत्रिक युगात लहान मुलांसह तरुणाहि अडकली आहे.हि पिढी पुन्हा मैदानाकडे यावी यासाठी तसेच त्यांच्यामध्ये शारीरिक आरोग्याविषयी जागृती निर्माण होण्यासाठी कोल्हापुर स्पोर्ट्स क्लबचे येत्या ९ जूनला छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सायंकाळी ४ वाजता रेसिडेन्सी क्लबमध्ये हा उद्घाटन सोहळा होणार आहे अशी माहिती अध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.यावेळी कोल्हापूर बुद्धिबळ असोसिएशनचे विश्वविजय खानविलकर,जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे असेही त्यांनी सांगितले.
तसेच तरुण पिढीला खेळासाठी प्रोत्साहन देणे आणि आकर्षित करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.ट्रॉयथॅलॉन या खेळाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी या क्लबची स्थापना केली आहे. ट्रॉयथॅलॉन हा खेळ मोठ्या शहरांत खूपच लोकप्रिय आहे.पणन खेळाची पंढरी समजल्या जाणाऱ्या कोल्हापुरात याबद्दल माहिती नाही तसेच या खेळासाठी कोल्हापूर योग्य ठिकाण आहे.
जिल्ह्यात एकूण खेळासाठी ३४ संघटना कार्यरत आहेत.यांच्यात समन्वय साधण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंना मदत करणे,स्पर्धा संयोजनासाठी निधी उपलब्ध करणे यासाठी स्पोर्ट्स क्लब कार्यरत राहणार आहे.व मॅरेथॉन, ट्रॉयथॅलॉन,डूएथकॉन,सारखे अनेक स्पोर्ट्स इव्हेंट्स या क्लबच्या वतीने आयोजित केले जाणार आहेत. या क्लबच्या उद्घाटन सोहळ्यास सर्व क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आव्हान क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी उपाध्यक्ष विजय कुलकर्णी,सचिव उदय पाटील,संजय पाटील,गोरख माळी,वैभव बेळगावकर,डॉ.संदेश बागडी,राहुल माने महेश शेळके,डॉ.प्रदीप पाटील आणि खजानीस आशिष तंबाके यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
Leave a Reply