कोल्हापूर: नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष सरकारला २६ मे २०१७ रोजी ३ वर्ष पूर्ण झाली.सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून सरकारने विविध योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.याचाच एक भाग म्हणून मोदी फेस्ट रथ ३० मे पासून भारतातील प्रमुख शहरात फिरत आहे.येत्या १०,११ आणि १२ जूनला हा रथ कोल्हापुरातील ५० चौकात फिरणार असून या रथाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना सकाळी १० ते ६ या वेळेत नागरिकांना सांगण्यात येणार आहेत.यावेळी शासकीय अधिकारी,राष्ट्रीय बँकांचे अधिकारी शासनच्या योजनांची माहिती देणार आहेत.तसेच याठिकाणी विविध योजना त्यांची माहिती केंद्रे नागरिकांसाठी आसन व्यवस्था इत्यादीची व्यवस्था कोल्हापूर भाजप महानगरच्यावतीने करण्यात आली आहे.केंद्र सरकारकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत या संदर्भात माहिती संकलित केली जात आहे.’जन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या सूचना पंतप्रधान यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.अशी माहिती कोल्हापूर भाजप महानगरचे अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिली.
Leave a Reply