पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील वाढदिनी खतांच्या स्वरुपात शुभेच्छा स्वीकारणार

 

कोल्हापूर :आपला वाढदिवस नेहमीच सामाजिक बांधलिकी जपणारा आणि समाजाला काही दान देणारा असावा, या हेतूने राज्याचे महसुल तथा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा यंदाचा वाढदिवस ही अन्नदाता शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून साजरा करण्याचे नियोजन केले आहे. शुभेच्छा स्वरूपात वस्तू,पुष्पगुच्छे न देता या वेळी सर्वांनी खतांच्या स्वरुपात शुभेच्छा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शुभेच्छा पण खताच्या स्वरूपात..असा सामाजिक वसा घेवूनच हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे.

यापूर्वी ही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधलिकीचा साजरा केला. रद्दीच्या स्वरुपात शुभेच्छा स्वीकारून ती रद्दी व आपल्याकडील काही मदत देवून त्यांनी विविध सामाजिक संस्थेंना मदतीचा हात दिला. दिनकर कांबळे सारख्यांना हातभार लावला. शहरातील वाढते प्रदूषण आणि तापमान वाढ रोखण्यासाठी झाडे लावण्याची गरज लक्षात घेवून रोपांच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारल्या. सुमारे ३५ हजार रोपे शुभेच्छांच्या स्वरूपात आली. ही रोपे केएसबीसीच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी लावून शहराचे सौदर्य खुलवलेच पण पर्यावरण रक्षणाचा संदेश ही दिला.

यंदाचा वाढदिवस बळीराजाला हातभार देण्यासाठी म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. शेतकऱ्यांना खते मिळाली तर त्याला थोडासा हातभार लावता येईल. जिल्ह्यातील बळीराजाची पीकपद्धती ध्यानात घेवून खताची मात्रा नत्र स्वरूपात देण्याचा मानस आहे किंबहूना त्यासाठी इफको किंवा कृपको या नामांकित कंपनीच्या युरीया या दाणेदार खताचे नियोजनपूर्ण वितरण केले जाणार आहे.

यासाठी १० जून रोजी सकाळी ९.३० ते ७ या वेळेत संभाजीगर येथे खतांच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारणार आहेत. तरी ज्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत, त्यांनी खतांसाठी खालील दिलेल्या संस्थांशी संपर्क साधून तेथूनच दर्जेदार खते शुभेच्छा स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शुभेच्छा देणाऱ्यांनी खालील ठिकाणाहून खते खरेदी करवीत व त्याची पावती जमा करावी (खते उचलून आणण्याचा त्रास होवू नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे.)

1) कोल्हापूर शहर व परिसर आणि कागल, हातगणंगले, शिरोळ,इचलकरंजी, करवीर  :  राधानगरी शेतकरी सहकारी संघ लि. सरवडे शाखा. शाहूपुरी

2) भुदरगड ः  भुदरगड शेतकरी सहकारी संघ लिमिटेड, गारगोटी

3) गडहिंग्लज ः श्री भावेश्र्वरी ग्राहक सहकारी संस्था लि. कौलगे

4) चंदगड ः चंदगड शेतकरी सहकारी खत विक्री संघ लि. यशवंतनगर

5) आजरा ः आजरा तालुका शेतकरी सहकारी संघ लि. आजरा

6) गगनबावडा ः महादेव हरी शिंदे तालुका सहकारी खरेदी विक्री संघ साळवण, गगनबावडा

7 ) शाहूवाडी ः उदयगिरी शाहू तालुका खरेदी विक्री संघ लि. बांबवडे

8) पन्हाळा ः वारणा शेतीपूरक व सहकारी प्रशिक्षण संस्था लि. वारणानगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!