
मुंबई: सरसकट कर्जमाफी यासह अनेक मागण्यासाठी 1 जून पासून शेतकऱ्यांनी संप पुकारला.पण आज सुकाणू समिती आणि मंत्रिगट यांच्यात आज मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.या बैठकीतसकारात्मक चर्चा झाली असून सरसकट कर्जमाफी देण्यास सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे.अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजच कर्जमाफी देण्यात येणार असून मध्यभूधारक आणि इतर शेतकरी यांच्या कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आली आहे.असे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले.तसेच आंदोलनदरम्यान ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते तेही मागे घेण्यात आले.यामुळे शेतकरी आंदोलनाचा विजय झाला आहे.स्वामिनाथन यांच्या शिफारशींवर चर्चा होणार असून समितीत शेतकरी यांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता.अभूतपूर्व असा निर्णय सरकारला शेतकऱ्यांनी घ्यायला लावला.आजपासून शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Leave a Reply