
कोल्हापूर: शुक्रवारी ९ जून रोजी श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या बांधलेल्या अलंकारिक पुजेबाबत श्रीपूजक मंडळाने आज खुलासा केला आहे.अंबाबाईला घागर चोळी स्वरुपात पूजा बांधली म्हणून भाविक संतप्त झाले असे वृत्तपत्रातून छापून आले पण ही पूजा राजस्थानातील एक देवी ‘खोडीयार माता’ या देवीच्या पुजेशी साध्यर्म असणारी ही पूजा असून यापूर्वीही अशी पूजा बांधली गेली होती.तसेच या देवीची कुमारी स्वरुपात पूजा बांधली जात असून अंबाबाईला नेसवलेली ती एकप्रकारची गोल शिवलेली साडीच आहे.घागरा चोळी नाही.असेही श्रीपुजक मंडळाने स्पष्ट केले आहे.तसेच अनेक भाविकांनी या स्वरूपातील पूजा अत्यंत सुंदर आहे असेही म्हटले आहे.राजस्थानात बहुतांश स्त्रियांचा पोशाख असा असतो.यामुळे आदिशक्ती जगदंबेची अश्याप्रकारे पूजा बांधणे गैर नाही.विनाकारण वाद निर्माण करणे यामुळे तीर्थक्षेत्राची बदनामी करू नये तसेच कोल्हापुरकारांनी याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहनही श्रीपुजक मंडळाने केले आहे.
Leave a Reply