
कोल्हापूर : छ.शिवाजी महाराज चौक सुशोभिकरण बाबतची बैठक आज महापालिकेच्या स्थायी समिती हॉलमध्ये महापौर सौ.हसिना फरास यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
प्रारंभी आमदार राजेश क्षिरसागर यांनी कोल्हापूरातील ऐतिहासीक असलेले केशवराव भोसले नाटयगृह व राजर्षि छत्रपती शाहूंचे कुस्ती मैदानाचे आजच्या काळात पुर्वीच्या इमारतींना धक्का न लावता चांगल्या पध्दतीने सुशोभिकरण केलेले आहे. यामुळे आर्किटेक्चर सुरत जाधव यांना छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभिकरणांची जबाबदारी सोपवलेली आहे. या पुतळयाचे सुशोभिकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी महापौर सौ.हसिना फरास यांची निवड करण्यात आलेली आहे. सदर समितीमधील सदस्यांची मते, सुचना जाणनेसाठी व आलेल्या सुचना नुसार या सुशोभिकरणाचे कामकाज विना विरोध होणेसाठी या बैठकीचे आयोजन केलेचे सांगितले. कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाबाबत स्वातंत्रपुर्व काळातील इतिहास आहे. हा इतिहास जपूनच सुशोभिकरण व्हावे अशी आमची इच्छा आहे.
आर्किटेक्चर सुरत जाधव यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक सुशोभिकरणांची जबाबदारी दिले बद्दल मी आमदार राजेश क्षिरसागर यांचे आभार मानतो. या सुशोभिकरणासाठी छ.शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे मुळचे स्थळ न हलवता 2 फुटांनी उंची वाढवली आहे. सदर सुशोभिकरणाचे डिझाईन हे आधुनिक पध्दतीने मुळचा ढाच्या न बदलता व चौकातील कोणत्याही वाहतुकीस अडथळा न होता केलेले आहे असे सांगितले. कोल्हापूर शहरात इतर राज्यातून व परदेशातुन पर्यटक म्हणून आलेल्या नागरीकांना व युवकांना छत्रपतींच्या कार्याची माहिती या शिल्पाद्वारे दाखविण्यात आलेली आहे. या चौकाचे ठिकाणी नविन तंत्रज्ञान वापरुन लाईट इफेक्टची व्यवस्थाही केलेचे त्यांनी सांगितले.
शरद तांबट यांनी 1942 ला घटस्थापनेदिवशी या पुतळयाला स्वातंत्र्यसैनिक सौ.भागीरथी तांबट व सौ.जयाबाई हिरवे यांनी विल्सनच्या पुतळयावर ऍ़सिडयुक्त डांबर ओतले होते. या घटनेस यावर्षी 75 वर्षे पुर्ण होणार आहेत. येथे मांडणेत येणाऱ्या शिल्पामध्ये हा इतिहास असावा असे सांगितले.
गणी अजरेकर यांनी कोल्हापूरच्या जडणघडणीचा समावेश या शिल्पामध्ये असावा असे सांगून याठिकाणी करण्यात येणाऱ्या विद्युत रोशनाइचा मेंटनन्स व्हावा. देखभालकरणेसाठी कमिटी स्थापन करावी अशा सुचना केल्या.
दिलीप देसाई यांनी चौक सुशोभिकरण करताना याठिकाणी ट्राफिकचा विचार करणे गरजेचा असलेचे सांगितले. चौकामध्ये रस्त्यावर गाडया उभ्या असतात. त्यामुळे या परिसरात पार्किंगची व्यवस्था व्हावी असे सांगितले.
माजी नगरसेवक आदील फरास यांनी चौक सुशोभिकरणासाठी आमदार राजेश क्षिरसागर यांनी 90 लाखाचा निधी आणलेबद्दल त्यांचे अभिनंदन केले. महापौर सौ.हसिना फरास यांची अध्यक्षपदी निवड केलेबद्दल विशेष अभार मानले. फरास घराणे हे पुर्वीपासून महाराजांची सेवा करत आलेले आहे आणि येथून पुढेही ते सेवा करत राहतील असे सांगितले.
माजी महापौर आर के पोवार यांनी बोलताना या पुतळयाचा इतिहास फार मोठा आहे. परंतु ट्रॅफिकच्या दृष्टीने येथे फार अडचण होत आहे. त्यामुळे पुतळा थोडासा इकडे तिकडे सरकवा लागला तर सरकवा असे आपले मत व्यक्त केले.
माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांनी या शिल्पामध्ये फक्त शिवाजी महाराजांचा पुर्ण इतिहास असावा इतर कोणत्याही गोष्टींचा समावेश करु नये अशा सुचना मांडल्या.
माजी नगरसेवक बाबा पार्टे यांनी सदर ठिकाणी वाहतूकीची कोंडी होत असलेने बस स्टॉप थोडासा पार्किंगमध्ये हलवावा अशा सुचना केल्या.
आमदार राजेश क्षिरसागर यांनी जेष्ठ मंडळींनी केलेल्या सुचनांचा विचार करुन आर्किटेक सुरत जाधव यांनी पुन्हा नव्याने आराखडा सादर करावा. आणखी कोणाच्या काही सुचना असतील तर त्यांनी महापौरांकडे लेखी स्वरुपात द्याव्यात. सर्वांचा चौक सुशोभिकरणाबाबत सकारात्मक विचार आहे. चौक सुशोभिकरणाबाबत पुन्हा एखादी बैठक घेवून यास अतिंम स्वरुप देऊया. या चौकाचा इतिहास पाहता स्वातंत्र सैनिकांच्या घटनेला या घटस्थापने दिवशी 75 वर्षे पुर्ण होत असलेने त्यादिवशी याचा शुभारंभ करुया असे सांगितले.
महापौर सौ.हसिना फरास यांनी आणखीन कोणाच्या सुचना असतील तर त्या लेखी स्वरुपात महापौर कार्यालयात द्याव्यात असे सांगून बैठकीमध्ये आलेल्या सुचनांचा व लेखी स्वरुपात आलेल्या सुचनांचा विचार करुन येत्या 8 ते 10 दिवसात पुन्हा बैठक घेवू. तसेच या सुशोभिकरण करण्यात आलेल्या चौकाचा देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची राहील असे सांगितले. उपमहापौर अर्जुन माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी परिवहन समिती सभापती नियाज खान, गटनेता शारंगंधर देशमुख, नगरसेवक अभिजीत चव्हाण, ईʉार परमार, सहाय्यक संचालक नगररचना धनंजय खोत, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, कॉ.चंद्रकांत यादव, राजेश लाटकर, सदानंद कोरगांवरक, चंद्रकांत सुर्यवंशी, डॉ.देवेद्र रासकर, अमर क्षिरसागर, चंद्रकांत बराले, रत्नदिप चोपडे,उदय शिंदे, संजय केसरकर, सागर शिंदे, संजय ढाले, दिपक गौड, आकाश नवरुखे आदी उपस्थित होते.
Leave a Reply