कोल्हापूर : युवा सेना अध्यक्ष मा.आदित्याजी ठाकरे यांच्या वाढदिवसाची पर्वणी साधून कोल्हापूर युवसेनेच्या वतीने युवा सेना चषक इनडोअर फुटबॉल स्पर्धेचे दि. १७ व १९ जून २०१७ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर वासियांचे फुटबॉल प्रेम जगजाहीर आहे. इथला फुटबॉल खेळ गल्ली बोळात खेळला जातो. कोल्हापूर वासियांना फुटबॉल स्पर्धेची अनोखी पर्वणी मिळावी या उद्देशाने युवा सेना अध्यक्ष मा.आदित्याजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवसेनेच्या वतीने भव्य इन डोअर सिक्स बाय सिक्स फुटबॉल स्पर्धेचे आयोजन दि. १७ व १९ जून रोजी “महालक्ष्मी जिमखाना, दसरा चौक, कोल्हापूर” येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण ३२ संघांनी सहभाग नोंदविला असून, या संघाचे ८ गटामध्ये विभागणी करण्यात आली आहे. या संघामधून बाद पद्धतीनी सामने खेळविण्यात येणार असून, सामने दिवस रात्र खेळविण्यात येणार आहेत.
या स्पर्धेतील विजेत्या संघास युवा सेना चषक आणि रोख १५ हजार रुपये, उपविजेत्या संघास उपविजेता चषक व रोख १० हजार रुपये आणि तृतीय संघास मानचिन्ह आणि रोख रु. ७ हजार अशी आकर्षक बक्षिसे देणेत येणार आहेत. याशिवाय स्पर्धेतील उत्कुष्ट खेळाडूना बेस्ट गोलकीपर, बेस्ट डिफेन्स, बेस्ट हाफ, बेस्ट फॉरवर्ड अशी वैयक्तिक बक्षिसेही देणेत येणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना, युवसेना पदाधिकारी यांच्या हस्ते उद्या शनिवार दि.१७.०६.२०१७ रोजी ठीक सायं.६.०० वाजता करण्यात येणार आहे. तरी शहरातील तमाम फुटबॉल रसिकांनी या स्पर्धेचा आणि होणारऱ्या रोमांचक सामन्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन युवसेना चषक फुटबॉल स्पर्धा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या संयोजन समितीमध्ये ऋतुराज क्षीरसागर, युवा सेना शहर संघटक चेतन शिंदे, अविनाश कामते, पियुष चव्हाण, शिवसेना विभागप्रमुख कपिल सरनाईक, ओंकार परमणे, अजिंक्य पाटील, सौरभ कुलकर्णी, सार्थक खतोडीया यांच्या सह युवा सैनिक व शिवसेना पदाधिकारी यांनी केले आहे.
Leave a Reply