
कोल्हापूर: कोल्हापुरात शहरात पर्यटक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.पण वाहनांचे सुयोग्य नियोजन नसणे अरुंद रस्ते,पार्किंग जागेत बेकायदेशीर उभ्या असणाऱ्या हातगाड्या आणि फेरीवाले यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत होती यावर उपाय म्हणून महापालिकेने पे अँड पार्क योजना बिंदू चौक येथे राबविण्यास सुरुवात केली.पण याचा फायदा होण्याऐवजी भिक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था झाली आहे.पार्किंग ठेकेदाराची दादागिरी यामुळे पर्यटक आणि नागरिक यांच्यात संताप व्यक्त होत आहे.हा ठेका महापालिकेने चालविण्यास घ्यावा अशी मागणी मोदी विचार मंचचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील सामंत यांनी केली आहे.चुकीच्या पद्धतीने हा ठेका चालविला जात असल्याचे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबत तक्रार करणार आहे असेही ते म्हणाले.चार चाकी आणि सहा चाकी वाहनांना दर तशी २५ ते ३० रु असताना ५ रुपये ज्यादा आकारणे,भाविक आणि पर्यटक यांच्यासाठी कोणत्याही सुविधा तेथे नाहीत.रस्ता डांबरीकरण,पट्टे,सीसीटीव्ही,स्वच्छतागृह,प्रकाशझोत,सुरक्षा व्यवस्था संरक्षण आदि सुविधा येथे नाहीत.फक्त पैसे वसूल करणे हा एकच उद्देश ठेवला आहे. तसेच ठेकेदार आणि तेथील कर्मचारी यांच्याकडून भाविकांना दादागिरीला सामोरे जावे लागते.दक्षिण कशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई चे महत्व अगाध आहे म्हणून कोल्हापूरला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आणि शासनाने याच्या विकासाला मंजुरी दिली.या पार्श्वभूमीवर मंदिराजवळील पार्किंगच्या ठेकेदाराची अरेरावी आणि लुट करणारी वागणूक कितपत योग्य असेही सामंत म्हणाले.तसेच बिंदू चौक सबजेल जवळच असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न आहेच.दरवर्षी करोडो रुपयांची बेहिशोबी मालमत्ता याचा हिशोब कोण देणार असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी एम. डी. पाटील, दत्तात्रय भारती, हेमंत वाघमारे,नितिन पाटील, सुशांत दळवी, बथुवेल बुचड़े, मारुती पाटिल,फिरोज शेख,अरुण देसाई,स्नेहा घोडके, कल्याणी जाधव,पूजा राजापुरकर, हेमा कुलकर्णी,सुप्रिया कांबळे, विजय पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply