राजस बोलला, विषय संपला! स्टार प्रवाहवरील ‘कुलस्वामिनी’ मालिकेतील संग्राम साळवीचा लोकप्रिय संवाद

 

देवयानी’ मालिकेतील संग्राम विखे पाटीलचा ‘तुमच्यासाठी कायपण’ हा संवाद प्रचंड गाजलाहोता. अगदी रस्त्यानं येता-जाताही हे वाक्य सहज कानावर पडायचं. संग्रामचा अजून एकसंवाद लोकप्रिय होऊ लागला आहे. स्टार प्रवाहच्या कुलस्वामिनी मालिकेतला ‘राजस बोलला,विषय संपला!’ हा संवाद हिट होत आहे.कुलस्वामिनी ही नवी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरू लागली आहे. रेणुकामातेची महती सांगताना आस्तिक नास्तिकतेचा संघर्ष या मालिकेतून दाखवला जात आहे. यामालिकेत संग्राम साळवी ‘राजस देवधर’ ही भूमिका साकारतो आहे. राजसच्या व्यक्तिरेखेला अनेकपदर आहे. लहानपणीच त्याची आई गेली. वडिलांशी त्याचं कधी पटलं नाही आणि वडिलांनीत्याला कधी समजूनही घेतलं नाही. त्यामुळे वडिलांच्या मनाविरूद्ध तो वागतो. मात्र, त्याच्या मनातमायेचा ओलावाही आहे. संग्रामला ‘राजस बोलला, विषय संपला’ असा खणखणीत संवादमिळाल्यामुळे या व्यक्तिरेखेला अजून आयाम मिळाले आहेत.मालिकेचे लेखक शिरीष लाटकर म्हणाले, ‘राजस ही अतिशय लव्हेबल व्यक्तिरेखा आहे. प्रत्येकगोष्टीला थेट भिडणारा आहे. त्याच्या मनात एक आणि ओठात एक असं काही नाही. त्यामुळेत्याच्या व्यक्तिरेखेसाठी काहीतरी तकिया कलाम असावा असं वाटत होतं. त्यातूनच ‘राजसबोलला, विषय संपला’ हा संवाद सुचला. या संवादानं ही व्यक्तिरेखा अजून उठावदार झाली आहे.संग्रामनं त्याच्या खास शैलीत ही व्यक्तिरेखा फुलवली आहे.’संग्राम साळवीचा खास अभिनय आणि दमदार संवादासाठी पहा कुलस्वामिनी सोमवार ते शनिवाररात्री 8 वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!