
कोल्हापूर: कोल्हापुरातील हिल रायडर्स आणि हायकर्स ग्रुप यांच्यावतीने ८ आणि ९ जुलै रोजी पन्हाळा ते पावनखिंड तेजोमय पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.१२ जुलै १६६० रोजी गजापुरच्या घोडखिंडीत महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासातील एक महत्वपूर्ण लढाई झाली.त्यावेळी ही लढाई आणि रणसंग्राम करणे सोपे नव्हते.ऐन पावसाळा तुफानी वारा,दऱ्या खोऱ्यातून वाट काढत शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या त्यातील एक पावनखिंड मोहीम.हाच इतिहास कसा घडला असेल याचा थरारक अनुभव घेण्यासाठी हिल रायडर्सच्या वतीने गेली ३२ वर्षे सातत्याने या ऐतिहासिक वाटेवरून पदभ्रमंतीचे आयोजन केले जाते.यावर्षी ८,९ जुलै आणि २२,२३ जुलै अश्या दोन मोहिमांचे आयोजन केले आहे.एक मुक्काम आणि २ दिवस एकूण ४७ किमी चा प्रवास पायी करण्यात येणार आहे.नाष्टा,जेवण,चहा याची सोय संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.याचे शुल्क ३०० रुपये असून सहभागी व्यक्तींना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.दरवर्षी हजारो लोक महाराष्ट्र आणि बाहेरून यात सहभागी होत असतात अशी माहिती संस्थेचे मार्गदर्शक विजय देवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.शिवप्रेमी,इतिहासप्रेमी,गिर्यारोहक,गडप्रेमी, निसर्गमित्र,वृक्षमित्र ,छायाचित्रकार यांच्यासाठी ही पदभ्रमंती म्हणजे पर्वणीच ठरणार आहे.असे विनोद कांबोज यांनी सांगितले.मोहिमेबरोबरच सामाजिक बांधिलकी या संस्थेने नेहमीच जोपासली आहे.या मार्गावरील अविकसित आणि दुर्गम गावातील मुलांना मदत करण्यात येते.तसेच www.townbuz.com या वेबसाईटवर ऑनलाइन बुकींचही सोय करण्यात आली आहे.तरी इतिहासाचा जिवंत थरार अनुभवण्यासाठी यात सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी ९४२३२८५१५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.पत्रकार परिषदेस प्रसाद अडनाईक, महेश जोके यांच्यसह पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply